Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिक ग्रामीणच्या पोलीस शिपायाने मागितली १० हजारांची लाच; गुन्हा दाखल

नाशिक ग्रामीणच्या पोलीस शिपायाने मागितली १० हजारांची लाच; गुन्हा दाखल

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक ग्रामीणच्या येवला पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या पोलीस शिपायाने १० हजार रुपयांची लाच मागितल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी येवला पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे…

- Advertisement -

अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांच्या वडिलांवर येवला शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या तक्रारीवर कायदेशीर कारवाई न करण्यासाठी पोलीस शिपाई अतुल सुधाकर फलके याने तक्रारदाराकडे १० हजार रुपयांची लाच मागितली होती. यानंतर तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागास याबाबतची तक्रार दिली.

दरम्यान, १७ ऑक्टोबर २०२० रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळापूर्व पडताळणीत अतुल फलके याने पंचांच्या समोर रक्कम मागितल्याचे निष्पन्न झाले.

यानंतर आज १८ नोव्हेंबर २०२० रोजी येवला शहर पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई अतुल फलके याच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

कोणत्याही शासकीय कार्यालयात कोणी शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी तसेच्या त्याच्या वतीने कोणी खासगी व्यक्ती लाचेची मागणी करत असेल तर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन नाशिक विभागाने केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या