नाशिक ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; बनावट नोटा चलनात आणणाऱ्यांना बेड्या

नाशिक ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; बनावट नोटा चलनात आणणाऱ्यांना बेड्या
USER

नाशिक | प्रतिनिधी Nashik

बनावट नोटा चलनात (Fake Note) आणणाऱ्या दोन संशयितांना (Two Suspected arrested from Surgana) सुरगाणा पोलीसांनी ताब्यात घेतले. प्रकरणी सुरगाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

अधिक माहिती अशी की, काल दि (०६) रोजी दुपारी साडेअकराच्या सुमारास तालुक्यातील उंबरठाण बाजारात (Umbarthan Market) दोन संशयित वस्तू खरेदी करताना दिसून आले.

हरीश वाल्मिक गुजर (वय २९, रा विंचूररोड येवला) व बाबासाहेब भास्कर सैद (वय ३८) रा चिचोंडी खुर्द ता येवला अशी दोघा संशयितांची नावे आहेत.

दोघांकडेही भारतीय चलनात बंदी असलेल्या नोटा मिळून आल्या. त्यांच्याकडे या नोटा कशा आल्या? कुठून त्यांनी या नोटा आणल्या याबाबत नाशिक ग्रामीण पोलीस तपास करत आहेत.

दोघांवर काल रात्री उशिरा सुरगाणा पोलीस ठाण्यात गुन्हा (Complaint registered in Surgana Police Station) दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.

त्यांच्याकडून १९ हजार ४०० रुपये रोख यामध्ये १०० रुपयांच्या १९४ नोटा तर ५०० रुपये रोख यासह एकूण २ लाख २८ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक बोडखे (API Bodake) अधिक तपास करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com