Saturday, April 27, 2024
Homeनाशिकमहाराष्ट्राचे उत्तुंग व्यक्तिमत्व 'उद्धव ठाकरे'

महाराष्ट्राचे उत्तुंग व्यक्तिमत्व ‘उद्धव ठाकरे’

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिक जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकार्‍यांनी त्यांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत….

- Advertisement -

बहुआयामी व्यक्तिमत्व

सुसंस्कृत, बहुआयामी, कुटुंब वत्सल, प्रेमळ व सर्वसामान्यांसाठी काम करणारं, जमिनीवर पाय असलेलं उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उल्लेख करावा लागेल.तीन पक्षाच्या महाआघाडी सरकारचे नेतृत्व करत असतांना आपल्या सहकार्‍यांना विश्वासात घेऊन करोना महामारीच्या काळात सर्वसामान्य करोना पिडितांना जीवदान देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली होत आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे.

– बाळासाहेब क्षीरसागर, अध्यक्ष, जिल्हा परिषद, नाशिक

देशात लोकप्रिय

गेल्या या सोळा महिन्याच्या कारकिर्दीत करोना काळात त्यांनी जे काम केले ते अतिशय उल्लेखनीय आहे म्हणूनच ते संपूर्ण देशात लोकप्रिय झाले आहे. स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेनेची धुरा उद्धव ठाकरे यांनी यशस्वीपणे सांभाळली असून राज्यात व देशात मोठ्या प्रमाणात शिवसेनेचा विस्तार होत आहे. आतापर्यंत त्यांनी जनतेसाठी केलेल्या उल्लेखनीय कामामुळे भविष्यात ते अनेक वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील यात तिळमात्र शंका नाही.

– बबन घोलप, शिवसेना उपनेते

कायापालट करतील

ज्याप्रमाणे बाळासाहेबांनी शिवसैनिकांना प्रेम दिले तसेच प्रेम उद्धव ठाकरे देत आहेत. 2009 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान त्यांनी मला शिवसेनेतर्फे नाशिक लोकसभा निवडणुकीची उमेदवारी देऊन मला निवडणूक लढविण्याचे बळ दिले. माझ्यासारख्या सर्वसामान्य शिवसैनिकांना त्यांनी जिल्हाप्रमुख हे पद सुद्धा दिले होते. आज सुद्धा मी शिवसेना या पक्षामुळेच मोठा असून वेळोवेळी मला त्यांचे मार्गदर्शन मिळत असते. ते आज राज्याचे मुख्यमंत्री आहेत. आपल्या कारकीर्दीत त्यांच्याकडून अनेक समाजपयोगी कार्य घडत असून भविष्यातही महाराष्ट्राचा ते कायापालट करतील हे निश्चित.

– दत्ता गायकवाड, माजी जिल्हाप्रमुख

सच्चा, मुत्सद्दी, प्रामाणिक नेता

जनतेच्या मनात घर करणारा, दिलदार आणि कोणत्याही खडतर परिस्थितीत राज्याचे सक्षम नेतृत्व करणारे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा उल्लेख करता येईल. अशा मुख्यमंत्र्याचा सार्थ अभिमान वाटतो.

– कुणाल दराडे,विस्तारक, युवा सेना महाराष्ट्र राज्य

जनतेच्या मनातले मुख्यमंत्री

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे करोना काळात कुटुंब प्रमुखासारखे वागत आहेत. संकट काळात कसे लढायचे याचीच जणू ते शिकवण देत आहेत. आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या महापूजेदरम्यान त्यांच्यातील सुसंस्कृत माणसाचे दर्शन महाराष्ट्राला झाले. कोकणात दीड फूट गाळात उतरून परिस्थितीची पाहणी करत पूरग्रस्तांचे अश्रू पुसत आहेत; त्यामुळेच ते जनतेच्या मनातले मुख्यमंत्री ठरत आहेत.

– सचिन बांडे, उपमहानगरप्रमुख, शिवसेना नाशिक

अभिमान वाटतो

राजकारणात योग्य भूमिका घेत त्यांनी शिवधनूष्य लिलया पेललेला आहे. करोना काळात अत्यंत सयंमी काम केले व देशात लोकप्रिय झाले. त्यांच्याकडे महाराष्ट्राला पुढे नेण्याची क्षमता आहे. अशा मुख्यमंत्र्याचा अभिमान वाटतो.

– विशाल खैरनार, उपमहानगर प्रमुख युवासेना नाशिक

लोकांचा विश्वास सार्थ

मुख्यमंत्री झाल्यापासून सर्व जाती धर्माच्या लोकांचा विश्वास सार्थ ठरवला आहे. करोना काळात त्यांनी केलेले काम अतिउत्तम होते. त्यांनी देशाचे नेतृत्व करावे अशी आमची भावना आहे. सर्वांना न्याय देण्याचे काम ते करीत आहे.

– अजीम सय्यद, जिल्हाप्रमुख, शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना

अप्रतिम काम

करोना काळात यांनी केलेल्या उल्लेखनीय कामांची दखल देशातील सुप्रीम कोर्टाने देखील घेतली. त्याच प्रमाणे अनेक मान्यवरांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले. त्यांनी सामान्य, गोरगरीब रस्त्यावर राहणार्‍या लोकांसाठी मोफत शिवभोजन देऊन त्यांनी अप्रतिम काम केले आहे.

– दस्तगीर पानसरे, जिल्हा प्रमुख, माथाडी कामगार सेना

अत्यंत संयमी काम

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जसे शिवसैनिकांची काळजी घ्यायचे, तसे आज शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे सुध्दा महाराष्ट्रातील तमाम जनतेची व शिवसैनिकांची विचारपुस करतात.. करोना काळात अत्यंत सयंमी काम केले. देशात लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून ओळख तयार झाली.

– सुनील जाधव, शिवसेना उपमहानगर प्रमुख, नाशिक

आदर्श घडविला

शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी तीन पक्षाचे सरकार चांगल्या प्रकारे चालवून आदर्श घडविला आहे. मोठ्या व्यापातूनही ते महाराष्ट्रातील तमाम जनतेची व शिवसैनिकांची विचारपुस करतात.

– शरद देवरे, ज्येष्ठ शिवसैनिक

धेय्याचे प्रतिक

कोविड सारख्या महाभयंकर आजारात राज्यातील लोकांची काळजी घेऊन खर्‍या अर्थाने धेय्याचे प्रतिक समोर ठेवले आहे. लोकांच्या रोजगार बूडत असताना त्यांना सलग धान्य पूरवठा करुन त्यांच्या चूलीची काळजी घेतली. रुग्णांना योग्य वेळी ऑक्सिजन व औषधांची पूर्तता ठेवत देशात राज्याचा नवा आदर्श निर्माण केला. त्यांच्या कार्यकूशलता व संयमी पणाला शतश: नमन.

– सविता गायकर, गृहीणी

शिवधनूष्य लिलया पेलले

शिवसेनेच्या माध्यमातून पक्ष संघटन चालवण्याची हातोटी त्यांच्याकडे होती. त्यांनी दाखवलेला संयमी प्रभाव निश्चितच चांगला आहे. राजकारणात योग्य भूमिका घेत त्यांनी शिवधनूष्य लिलया पेललेले आहे. आमच्या सारख्या सामान्य रिक्षा चालकांचा विचार करुन 1500 रुपये थेट खात्यात टाकले. सामान्यांची काळजी घेणे हेच शिवसेनेचा मुळ उद्देश आहे.

– शिवाजी सोनवणे, रिक्षाचालक

संयमी नेतृत्व

हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्ष म्हणजे एक जहाल नेतृत्व मात्र या नंतरच्या काळात शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी पक्षाची धुरा हातात घेतली तेव्हा एक मवाळ, शांत आणि संयमी नेतृत्व शिवसेना सारख्या पक्षाची धुरा कशी सांभाळतील अशी शंका प्रत्येकाचा मनात होती. मात्र या सगळ्या शंकाकुशंकावर मात करून उद्धव ठाकरेंनी दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री पदावर विराजमान होतांना महाराष्ट्रातील जनतेला एक संयमी नेतृत्व दाखवून दिले.

– हरी काळे, शिवसैनिक

टीकाकारांना चपराक

गोरगरीबांचे, सर्वसामान्य जनतेच्या मनातले आणि संकटकाळी धावून जाणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असून त्यांचे कार्य महान आहे. पक्षप्रमुख आणि त्यानंतर मुख्यमंत्री म्हणून त्यांनी राज्याची धुरा हातात घेतली तेव्हा चौफेर टीका झाली. मात्र त्यांनी स्वकर्तुत्वाने यावर मात केली. आपल्या कामातून टीकाकारांना चपराक दिली. माझ्या सारखे लाखो सर्वसामान्य कार्यकर्ते उद्धवजी ठाकरे यांना भावी पंतप्रधान म्हणून बघू इच्छिता.

– दिगंबर मोगरे, शिवसैनिक

एक संदेश पोहोचला

शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांनी करोना काळातली परिस्थिती अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळली आणि लोकांमध्ये एक संदेश पोहोचला की आपले कुटुंब आपली जबाबदारी या माध्यमातून सर्वसामान्यांच्या मनात घर निर्माण केले.

– सुयश पाटील, शिवसेना विभागप्रमुख, नवीन नाशिक

सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून सन्मान

ज्या दिवशी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्या दिवसानंतर काही महिन्यातच संकटावर संकटे येत आहे. नैसर्गिक आपत्ती म्हणा किंवा करोना महामारीत आपले सर्वस्व पणाला लावत स्वतःच्या तब्येतीची काळजी न करता योगदान देत त्यांनी तीन वेळा सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून हा सन्मान मिळवला आहे. त्यांची काम करण्याची पद्धत ही वाखाणण्याजोगी आहे. सर्वसामान्य नागरिकांना एक समाधान आहे, आणि घराघरात मुख्यमंत्री उद्धव साहेब यांचे नाव पोहोचले आहे.

– निलेश साळुंखे, शिवसेना विभागप्रमुख

नेहमी संवेदनशील

राज्याच्या सर्वोच्चपदावर विराजमान होऊनही सत्तेची हवा डोक्यात जाऊ न देणारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या रुपाने महाराष्ट्र अनुभवतो आहे. करोनाच्या संकटाचा सामना करताना जनतेच्या दुख:शी ते नेहमी संवेदनशील असतात.

– अजित आव्हाड, संचालक,नाशिक जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी बँक.

संवेदनशील मुख्यमंत्री

राजकीय वर्तुळामध्ये युवा नेते म्हणून पदार्पण करणारे उद्धव ठाकरे यांनी वयाच्या जवळपास ‘साठी’च्या टप्प्यात मुख्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला. शेवटच्या घटकापर्यंत प्रत्येक समस्येवर बारकाईने लक्ष देऊन न्याय मिळवून आणि समस्येवर उपाय करणारे, तसेच शेतकरी व कामगारांच्या वेदनांची जाणीव असलेले संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून त्यांची ओळख निर्माण होत आहे. राज्याचे नेत्तृत्त्व आपल्या खांद्यांवर पेलत, इतर पक्षांच्या नेतेमंडळींना सोबत घेत उद्धव ठाकरे यांनी अनेक आव्हानांचा सामना केला आहे.

– समाधान बोडके-पाटील, माजी तालुकाप्रमुख

- Advertisment -

ताज्या बातम्या