Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याउकाड्याने शहरवासीय हवालदिल; ३९.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

उकाड्याने शहरवासीय हवालदिल; ३९.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

राज्यासह जिल्ह्यातील काही भागात पावसाच्या (Rain) सरी बरसल्यानंतर दोन दिवसांपासून नाशिकमध्ये अंशतः ढगाळ वातावरण असतानाच शहरवासीयांना मात्र उन्हाच्या चटक्यांबरोबरच प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहेत. चार दिवसांपूर्वी ३४.३ अंश सेल्सिअसपर्यंत घटलेल्या कमाल तापमानात चार अंशांनी वाढ झाल्याने प्रचंड उकाड्याने शहरवासीय हवालदिल झाले आहेत…

- Advertisement -

शहरात मंगळवारी (दि.३०) कमाल तापमान ३८.७ अंश सेल्सिअस नोंदवीले गेले.त्यात बुधवारी वाढ होऊन ३९.३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. दोन दिवस दिवसभर अंशतः ढगाळ वातावरण राहिल्यामुळे ऊन सावलीचा खेळ पहायला मिळाला. दि.४ जूनपर्यंत शहराचे तापमान पुन्हा ३८ अंश सेल्सिअसवर जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

दि. ९ जूनपर्यंत तळकोकणात मान्सून दाखल होण्याचा अंदाज असल्याने तापमानात चढ-उतार होत असल्याचे प्रादेशिक हवामान विभागाने म्हटले आहे.शहरात मे महिन्याच्या चौथ्या आठवड्यात ३७ अंश सेल्सिअसपर्यंत कमाल, तर २३ अंशांपर्यंत किमान तापमान स्थिर होते.

Nashik : भुसावळ आणि मनमाड रेल्वे पोलिसांनी केली ५९ बालकांची सुटका; काय आहे प्रकरण?

या तापमानात चार दिवसांपूर्वी घट झाल्याने कमाल ३४.३, तर किमान २३.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आर्द्रता ७४ टक्क्यांपेक्षाही जास्त असल्याने उकाडा घटला. मात्र, दोन दिवसांपासून राज्यातील काही भागात पाऊस झाल्याने त्याचा परिणाम नाशिकमध्येही जाणवत आहे. शहरात पुन्हा सकाळपासून उकाडा सहन करावा लागत आहे. ढगाळ वातावरण असूनही शहर व जिल्हावासियांना उन्हाच्या झळा बसत आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

Gautami Patil : बोल तू होतेस का माझी परी?; शेतकरी पुत्राकडून गौतमीला लग्नाची मागणी

- Advertisment -

ताज्या बातम्या