'पीडब्ल्यूडी'चे दोन मोठे मासे एसीबीच्या गळाला

मुख्य लिपिक आणि महिला वरिष्ठ लिपिकला दहा हजारांची लाच स्विकारताना पकडले
'पीडब्ल्यूडी'चे दोन मोठे मासे एसीबीच्या गळाला

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिकच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील (Public works department) उत्तर विभाग कार्यकारी अभियंता कार्यालयातील मुख्य लिपिक (Head clerk) आणि वरिष्ठ लिपिक (Senior Clerk) महिलेला दहा हजारांची लाच स्विकारताना (Demand for ten thousand rupees bribe) नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. प्रवीण नामदेव पिंगळे तर लता शांताराम लहाने-बोडके असे संशयित लाचखोरांची नावे आहेत...

अधिक माहिती अशी की, मुख्य लिपिक पिंगळे आणि महिला वरिष्ठ लिपिक लहाने बोडके यांनी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याचे सेवा पुस्तक पडताळणी, रजेच्या फरकाचे बिल तसेच इतर बिलांचे काम करून देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच मागितली होती.

दरम्यान, तक्रारदाराने लाचलुचपत विभागाशी संपर्क करून लाच मागितल्याची तक्रार केली. यानंतर लाचलुचपत विभागाने ठरल्याप्रमाणे याठिकाणी सापळा रचला.

लाचेची रक्कम आज येथील आस्थापना विभागात देण्याचे ठरले होते. यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कार्यकारी अभियंता येथे वरील संशयित दोघांना लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com