Friday, April 26, 2024
HomeUncategorizedphoto gallery व्यापाऱ्यांवर निर्बंध, मात्र पर्यटन मुक्तपणे सुरु

photo gallery व्यापाऱ्यांवर निर्बंध, मात्र पर्यटन मुक्तपणे सुरु

सर्व छायाचित्र : सतीश देवगिरे

नाशिक (nashik)

- Advertisement -

कोरोनाकाळात (Corona) शासनाचे निर्बंध सुरु आहेत. नाशिकमध्ये (nashik) आता बाजारात प्रवेश करण्यासाठी पास दिली जाणार आहे. परंतु तुम्हाला पर्यटन करायचे असेल तर काहीच निर्बंध असणार नाही. मुक्तपणे फिरा, कोणीही रोखणार नाही. मास्क वापरु नका, सोशल डिस्टेंसिंगचे (social distancing) पालन करु नको? कोणी थांबवणार नाही. कारण या ठिकाणी कोरोना येणार नाही, अशीच प्रशासनाची समजूत असल्याने मुक्तपणे नाशिक परिसरातील पर्यटन (tourism) सुरु आहे. सोमेश्वर धबधब्यावर (someshwar water fall) आज विकएंड साजरा करण्यासाठी झालेली गर्दी आणि परिस्थिती पाहिल्यावर ‘कोरोनामुक्त झोन’ झाल्याचा आभास होत आहे.

मॉन्सून गेला कुठे ? केव्हा पुनरागमन होणार ?

नाशिक शहरात गेल्या दोन दिवसांपासून रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. शहरात निर्बंध सुरुच आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवसाय शनिवारी व रविवारी बंदच आहे. सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत व्यवसाय सुरु ठेवण्यात आले असून संध्याकाळी पाच वाजेपासून संचारबंदी लागू केली आहे. अर्थव्यवस्थेसाठी महत्वाचा भाग असणाऱ्या व्यवसायांवर कोरोना रोखण्यासाठी हे नियम लावले आहे. परंतु पर्यटनावर काहीच निर्बंध नाही. नाशिक परिसरातील पर्यटन स्थळांवर शनिवारी, रविवारी मुक्तपणे फिरा? कोणीच तुम्हाला रोखणार नाही.

बाजारातून तासाभरात या, पण पर्यटनावर किती वेळ थांबा

बाजारातून तासाभरात परत या, त्यासाठी आता पुन्हा नागरिकांना पास दिली जाणार आहे. यापुर्वी फसलेला हा प्रयोग पुन्हा सुरु होत आहे. बाजारातील गर्दी रोखण्यासाठी हा प्रयत्न आहे. परंतु तुम्ही सोमेश्वर धबधब्यावर कितीही गर्दी करा, कितीही तास घालवा तुम्हाला कोणी रोखणार नाही. कारण अर्थव्यवस्थेपेक्षा मनोरंजन महत्वाचे झाले आहे. मुख्य रस्त्यापासून धबधब्यापर्यंत जाताना बॅरीकेडस सुद्धा नाही. येथील मंदिरे बंद आहेत, परंतु धबधब्यापर्यंत सहज जाता येते. तसेच फोटोसेशन उत्तम प्रकारे करता येत आहे.

काय आहे सोमेश्वर धबधब्याचे वैशिष्ट

दुधसागर धबधबा म्हणून ओळखला जाणारा सोमेश्वर धबधबा हा नाशिक पासून सुमारे ८ कि.मी. अंतरावरील सोमेश्वर येथे आहे. हा धबधबा प्रसिध्द पर्यटन स्थळ आहे. सुमारे १० मीटरचा शुभ्र पाण्याच्या फेसाने फेसाळलेला या धबधब्याला दुध सागर हे नाव पडलेले आहे. दुधसागर म्हणजे एक प्रकारे दुधाच्या समुद्राचा आभास सदर ठिकाणी निर्माण होतो.

सोमेश्वर मंदिर

सोमेश्वर मंदिर नाशिकच्या उत्तरेस म्हणजे नाशिक गंगापूर रस्त्यानजिक सुमारे ४ कि.मी. अंतरावर गोदावरी नदीच्या काठी हे भगवान महादेवाचे मंदिर आहे. तेथे स्वयंभू सोमेश्वर प्रकट झाले आहेत. त्या स्थळावर सोमेश्वराचे आद्य मंदिर असून मंदिराखालून गुप्त गंगा वहात असून ती जवळच असलेल्या एका झाडाखालून प्रकट झाली आहे. तिचा प्रवाह अव्याहत चालू असतो. मंदिराचा परिसर अतिशय रमणीय आणि नयनमनोहर आहे. दर्शनांनतर गोदावरी नदीत बोटिंग आनंद घेता येतो. पुढे गंगापूरचा धबधबा असून त्याच्या पुढे शंकराचार्य डॉ.कुर्तकोटींचा आश्रम व बालाजी मंदिर आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या