नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा; सिकंदर पोपटाचे छायाचित्र 'न्युजलेटर फॉर बर्डवॉचर्स'मध्ये प्रकाशित

नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा; सिकंदर पोपटाचे  छायाचित्र 'न्युजलेटर फॉर बर्डवॉचर्स'मध्ये  प्रकाशित

नाशिक | Nashik

भारतीय पक्ष्यांमधील रंग विकृती या विषयावरील रिसर्च पेपर भारतातील सर्वात जुने पक्षीविज्ञान वृत्तपत्र 'न्युजलेटर फॉर बर्डवॉचर्स' (Newsletter for birdwatchers) मध्ये प्रकाशित झाले. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे (Bombay Natural History) शास्त्रज्ञ व जेष्ठ पक्षिमित्र राजू कसंबे (birdfriend raju kasambe) यांनी लिहिलेल्या यलो पॅराकीट्स आणि बार्बेट्स विषयावरील केसपेपरमध्ये पक्ष्यांमधील रंग विकृतीबद्दल पूर्ण माहिती देण्यात आली आहे.....

या केसपेपर मध्ये नेचर क्लब ऑफ नाशिकचे अध्यक्ष प्रा. आनंद बोरा, यास्मिना नरेचनिया (Yasmina Narechniya), संदिप गभणे (Sandip Gabhane) आणि हेताली सोनेजी कारिया (Hetali sonaji karia) हे सर्व सहलेखक असून या अंकात ‘यलो’ नावाचा शोधनिबंध प्रकाशित केला आहे.

प्रा. आनंद बोरा (Prof Anand Bora) यांनी करोना काळात केलेल्या पक्षी निरीक्षणाच्या वेळी शहरामध्ये आंशिक अल्बिनिझम सिकंदर पोपट दिसला. त्याची छायाचित्र काढली.

अधिक माहिती साठी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे शास्त्रज्ञ राजू कसंबे यांना पाठविली. तो पक्षी असामान्य असल्याचे निदर्शनास आले. पॅराकीट्स आणि बार्बेट्स या भारतीय पक्ष्यांमध्ये रंग विकृती अनेक वेळा पक्षीमित्रांना गोंधळात टाकत असते.

अनुवांशिक उत्परिवर्तनामुळे पक्ष्यांच्या रंगात बदल कसे होतात. या विषयावर हा केस सादर झाला असून या प्रकाशित अंकाच्या मुख पृष्ठावर प्रा. बोरा यांच्या सिकंदर पोपटाचे छायाचित्र छापले आहे.

हा अगोदर नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात प्रथमच दिसलेल्या पांढऱ्या शेपटीच्या गरुडाचे छायाचित्र देखील प्रसिद्ध झाले होते. नाशिक येथे 22 एप्रिल 2021 रोजी प्रा. बोरा यांनी बघितलेल्या सिकंदर पोपटाच्या एका कळपात विशिष्ट पक्ष्याच्या पिसारावर अनेक डाग होते.

पिवळा रंग जणू ब्लीच झाला आहे आणि रंग पातळ झाल्याचे दिसत होते. अंगावरील ठिपके डोके, पंख, डोके आणि पाठीवर ते दिसत होते.शेपटी वर पिसे अगदी कमी होती.

पक्षी निरीक्षण करतांना आता पक्षी निरीक्षक आणि वन्यजीव छायाचित्रकार अभ्यासाच्या दृष्टीकोनातून बघत असल्याचे आनंद होत आहे.सर्व सह लेखकांच्या मदतीमुळे हा अभ्यास करणे सोपे झाले.पक्षी जीवन समजून घेण्यासाठी टिपणे घेणे, नोंद वही करणे आवश्यक आहे. भारतीय पक्ष्यांमधील रंग विकृती विषयी या रिसर्च पेपर मध्ये आम्ही सादरीकरण केले.

राजू कसंबे, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, मुंबई

भारतातील सर्वात जुने पक्षीविज्ञान वृत्तपत्र "न्युजलेटर फॉर बर्डवॉचर्स" मध्ये रिसर्च पेपर आणि छायाचित्र प्रकाशित होणे हि खूप मोठी गोष्ट आहे.मी गेली वीस वर्ष पक्षी निरीक्षण करीत असून अनेक दुर्मिळ पक्षी नासिक मध्ये दिसली.त्याची नोंद केल्या नंतर बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी कडून चांगले मार्गदर्शन मिळते.राजू कसंबे यांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही पक्षी अभ्यास करीत आहोत.

प्रा. आनंद बोरा, अध्यक्ष, नेचर क्लब ऑफ नाशिक

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com