...अखेर नाशिकच्या पोलीस आयुक्तांची बदली

...अखेर नाशिकच्या पोलीस आयुक्तांची बदली
दीपक पांडेय

नाशिक | प्रतिनिधी Nashik

अखेर नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी जयंत नाईकनवरे यांची नाशिकचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची माहिती मिळते आहे...

पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांची महिला अत्याचार प्रतिबंधक विभागात बदली करण्यात आली आहे. तर नवे आयुक्त म्हणून जयंत नाईकनवरे यांना नाशिकची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे समजते.

दीपक पांडेय
नाशिकमध्ये चर्चा आयुर्वेदिक पाणीपुरीची...

गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या बदलीची चर्चा सबंध शहरात होती. शहराचा दंडाधिकारी आपण असल्यामुळे परवानगी शिवाय काहीही करता येणार नाही. त्यामुळे पोलीस परवानगी वरून नाशिककर पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांना कंटाळले होते. अनेकांकडून यावरून नाराजी आणि रोष व्यक्त केले जात होता.

पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांची तक्रार पालकमंत्री तसेच गृहविभागाकडेदेखील करण्यात आली होती. त्यामुळे लवकरच या आयुक्तांची बदली होईल अशी चर्चा शहरात सुरु होती. अखेर आज याबाबतचे आदेश गृहविभागाकडून प्राप्त झाले आहेत. त्यांची महिला अत्याचार विभागात बदली करण्यात आली आहे.

त्यांच्या जागी जयवंत नाईकनवरे यांची नाशिकच्या पोलीस आयुक्तपदी वर्णी लागली आहे.

कोण आहेत जयवंत नाईकनवरे?

सविस्तर लवकरच...

Related Stories

No stories found.