Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिकचे पोलिस आयुक्त म्हणतात, राणेंवर १७ सप्टेंबरपर्यंत कारवाई नाही, पण २ तारखेला...

नाशिकचे पोलिस आयुक्त म्हणतात, राणेंवर १७ सप्टेंबरपर्यंत कारवाई नाही, पण २ तारखेला ते येतील

नाशिक | प्रतिनिधी Nashik

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister) यांच्यांवर १७ सप्टेंबरपर्यंत आता कारवाई करणार नाही. परंतु नारायण राणे हे केंद्रीय मंत्री व देशाचे जबाबदार नागरीक आहेत. यामुळे त्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे २ सप्टेंबरला ते नाशिकमध्ये येतील व आपला जबाब नोंदवून तपासाला सहकार्य करतील, असे नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय (Nashik City Police Deepak pandey) यांनी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

- Advertisement -

नारायण राणे यांच्यावर १७ सप्टेंबरपर्यंत कारवाई करु नये- उच्च न्यायालयाचे आदेश

नारायण राणे यांना नाशिक पोलिसांकडून (Nashik City Police) नोटीस बजावण्यात आली अाहे. त्या नोटीसीप्रमाणे २ सप्टेंबर रोजी नाशिकला (Nashik) त्यांना हजर राहावे लागणार आहे. त्यासंदर्भात पांडेय म्हणाले की, २ सप्टेंबरला ना. राणे यांनी नाशिकला येण्याचे मान्य केले आहे. नोटीस मिळाल्यासंदर्भात त्यांची सही देखील आहे. राणे साहेब माजी मुख्यमंत्री होते. आता केंद्रीय मंत्री आहेत. देशाचे जबाबदार नागरीक आहेत. यामुळे पोलिसांच्या तपासाला सहकार्य करतील. त्यादिवशी येऊन जबाब नोंदवतील व इतर कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करतील. जर २ सप्टेंबरला ते आले नाही तर त्यानंतर त्यासंदर्भात निर्णय घेता येईल.

आमच्यावर दबाब नव्हता, कायद्याप्रमाणे काम केले

नाशिक पोलिसांनी राज्य सरकारच्या दबावामुळे कारवाई केली? या प्रश्नावर दीपक पांडेय म्हणाले, २३ ऑगस्ट रोजी शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांची तक्रार आली. त्या तक्रारीची आम्ही शहनिशा केली. तक्रारीत तथ्य आढळल्यामुळे गुन्हा दाखल केला. त्यानंतर ना.राणे यांना अटक करण्यासाठी २४ ऑगस्टला पथक पाठवले. हे सर्व मी तोंडी केले नाही. यासंदर्भात सर्व लेखी आदेश आहेत. आमच्यावर राज्य सरकारकडून कोणताही दबाव नव्हता. देशातील संविधानाप्रमाणे आम्ही कार्य केले आहे. याबाबत आम्ही घाईघाईने कारवाई केल्याचा आरोप चुकीचा आहे. देशातील कायद्याप्रमाणे उशीरा गुन्हा दाखल केल्यास कारण द्यावे लागते. गुन्हा दाखल करणे व अटक करणे या दोन्ही कारवाई न्यायसंगत आहे. मी जी कारवाई केली ती योग्य असल्यावर मी ठाम आहे.

परब यांच्यांशी आजपर्यंत बोललो नाही

सोशल मीडियावर मंत्री अनिल परब यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडिओत परब राणे यांना अटक करण्याचे सांगत आहेत. यासंदर्भात दीपक पांडे म्हणाले, मी अनिल परब यांच्यांशी आजपर्यंत कधीच संभाषण केले नाही. यामुळे त्या व्हिडिओत समोर असणारा व्यक्ती मी नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या