Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याएमडी प्रकरणी नाशिक पोलिसांची पुन्हा सोलापूरात कारवाई; स्पीकर बॉक्समधून मिळत होता ड्रग्जचा...

एमडी प्रकरणी नाशिक पोलिसांची पुन्हा सोलापूरात कारवाई; स्पीकर बॉक्समधून मिळत होता ड्रग्जचा माल

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

एमडी ड्रग्ज प्रकरणाचे पाळेमुळे शोधण्याचे काम नाशिक पोलीस करत असून पुन्हा नाशिक पोलिसांनी सोलापूरमध्ये जाऊन छापा टाकून कारवाई केली आहे. शुक्रवारी मध्यरात्री ही कारवाई झाल्याची माहिती पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिली. अंमली पदार्थ विरोधी विशेष पथकाने ही कामगिरी केली आहे….

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, सोलापूर येथे एमडी बनविण्याकरीता लागणारे मुख्य रासायनिक द्रव्याचे प्रत्येकी ५ ड्रम, अंदाजे रुपये २२ लाख किंमतीचे, तसेच १७५ किलो कुड पावडर, एक ड्रायर मशीन दोन मोठे स्पिकर बॉक्स व इतर साहित्य असा एकूण सुमारे ४० लाख किंमतीचे एमडी बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल मिळून आला. मुख्य आरोपी सनी पगारे याला फरारी असलेला मुख्य सुत्रधार सोलापूर येथे एमडी बनवून ती स्पिकर बॉक्समध्ये लपवून स्पिकर बॉक्सद्वारे सनी पगारेकडे देत होता. सोलापूर येथे नाशिक शहर पोलीसांनी एमडी पावडर बनवण्याच्या कच्चा मालाचे गोडावूनवर कारवाई केले आहे. ७ सप्टेंबर २०२३ रोजी एमडी प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी ८ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

तसेच या गुन्हयातील मुख्य आरोपी सनी पगारे यांच्याकडून केलेल्या तपासात नाशिक शहरात येणारी एमडी ज्या कारखान्यातून बनवण्यात येते तो सोलापूर येथील चंद्रमोळी एमआयडीसी मोहोळ येथील एमडी बनविणारा कारखाना या गुन्ह्याच्या तपासासाठी तयार केलेल्या अंमली पदार्थ विरोधी विशेष पथकाने शोधून कारखाना उद्ध्वस्त केला होता. पथकाने या गुन्हयात अटक संशयितांकडून आतापर्यंत एकूण ९ किलो ६९० ग्रॅम एमडी व ८ किलो ५०० ग्रॅम एम.डी सदृष्य तसेच अंमली पदार्थ निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल, द्रव्य रसायन व साहित्य साधने सुमारे १,०९,११,५०० रूपये असा एकूण १०,६३,७०,५० रूपयांचा मुददेमाल हस्तगत केला होता.

दरम्यान, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. सिताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि विजय ढमाळ, सपोनि हेमंत नागरे, सपोनि. प्रविण सुर्यवंशी, हेमंत फड व विशेष पथकातील अंमलदार सपोउनि. बेंडाळे, पोना. चंद्रकांत बागडे, पोकॉ. अनिरुध्द येवले, पोकॉ. बोरसे, पोकॉ. पानवळ, राजु राठोड व चापो अं गावीत यांनी केली आहे.

हावळेला पोलीस कोठडी

या कारखान्याचा शोध लावल्यानंतर तो तयार करण्यासाठी मदत करणारा मनोहर पांडूरंग काळेला २७ ऑक्टोबरला अटक करण्यात आली होते. त्यानंतर पथकाने अधिक चौकशी केल्यावर ता.मोहोळ जि. सोलापुर येथे राहणारा वैजनाथ सुरेश हावळे (वय २७) याने कारखान्यासाठी मदत केल्याचे समोर आले होते. तो पाहिजे आरोपींच्या मदतीने स्वत: ही एमडी बनवित असल्याचे समोर आले. म्हणून त्याला देखील अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला ७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या