नाशिक ऑक्सिजन लिकेज : मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री निधीतून पाच लाखांची मदत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा : घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

नाशिक ऑक्सिजन लिकेज : मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री निधीतून पाच लाखांची मदत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई

नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती होऊन 22 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. तसेच घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली.

Title Name
नाशिक ऑक्सिजन लिकेज : २२ जणांचा मृत्यू, संख्येत वाढ होण्याची भीती
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करुन दोषींना निश्चित शिक्षा केली जाईल. यापुढे अशा प्रकारची कोणतीही दुर्घटना घडू नये याची काळजी घेतानाच, राज्यातील सर्व रुग्णालयांमध्ये ऑक्सीजन पुरवठा सुरक्षित व सुरळीत सुरु राहील, याची दक्षता घेण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी दिला.

मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी तीन सदस्यीय चौकशी समिती नेमण्याची घोषणा केली.

मुख्यमंत्र्यांनी म्हटले की, नाशिक महानगरपालिका रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेची बातमी धक्कादायक आहे, मन हेलावणारी आहे. ऑक्सिजन टाकीच्या गळतीने २२ रुग्णांना प्राण गमवावे लागले. हे दुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. एकाएका कोरोना रुग्णास सावरण्यासाठी महाराष्ट्र शासन शर्थ करीत असताना असा अपघात आघात करतो. राज्याची संपूर्ण यंत्रणाच या युद्धात स्वतःला वाहून घेत आहे. मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन कसे करू ? त्यांचे अश्रू कसे पुसू ? अपघात असला तरी मृतांच्या नातेवाईकांचे दुःख मोठे आहे. या अपघाताची खोलात जाऊन चौकशी होईलच.

या दुर्घटनेस जबाबदार असेल तर त्याची गय केली जाणार नाही, पण या दुर्दैवी घटनेचे राजकारणही कुणी करू नये. संपूर्ण महाराष्ट्रावर हा आघात आहे. नाशिकच्या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकमग्न आहे!”

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com