Thursday, May 2, 2024
Homeनाशिकनाशिक 'वन फिफ्टी वन' ऐतिहासिक कार्यक्रम ठरणार

नाशिक ‘वन फिफ्टी वन’ ऐतिहासिक कार्यक्रम ठरणार

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक जिल्ह्याच्या स्थापनेला १५० वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून आपण ‘नाशिक वन फिफ्टी’ हा कार्यक्रम मागील वर्षी साजरा करणार होतो. परंतु कोरोनामुळे तो साजरा करता आला नाही. आता आपण ‘नाशिक वन फिफ्टी वन’ या नावाने तो कार्यक्रम अधिक जोमाने साजरा करणार आहोत. अशी घोषणा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली…

- Advertisement -

या कार्यक्रमाच्या निमित्ताने नाशिक जिल्ह्याची सर्व शक्तिस्थळे जगासमोर यानिमित्ताने मांडली जातील व त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला अधिक चालना मिळेल याची खात्री असल्याचे भुजबळ म्हणाले.

यावर्षी ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आपल्या शहरांमध्ये होत आहे ही सर्वांसाठी आनंदाची बाब आहे. या संमेलनासाठी शासकीय व प्रशासकीय पातळीवरून संपूर्ण सहकार्य केले जाईल व सर्व नाशिककरांनी या संमेलनासाठी सहकार्य करावे असे आवाहन देखील यावेळी त्यांनी केले.

जिल्ह्यातील दोन्ही महानगरपालिका नागरिकांना उत्तम सेवा देण्यासाठी व शहर विकासासाठी कटिबद्ध असून नाशिक महापालिकेला नुकताच शहर स्वच्छतेच्या संदर्भातील ओडीएफ प्लस प्लस या दर्जा प्राप्त झालेला आहे.

आरोग्याच्या क्षेत्रात जिल्ह्यात करण्यात आलेल्या कामाचे कौतुक केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत ‘कायाकल्प’ पुरस्काराने जिल्ह्याला सन्मानित करून केले आहे. जिल्हा रुग्णालयास राज्यस्तरावरील प्रथम पुरस्कार तर जिल्ह्यातील १३ आरोग्य संस्थांना ‘कायाकल्प’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. ही नाशिक जिल्ह्यासाठी अभिमानास्मद बाब असून कोरोना काळात आरोग्य यंत्रणेकडून समन्वयाने अविरतपणे सेवा देणे सुरू आहे.

नागरिकांची शासकीय कार्यालयातील कामे नागरिकांचा हक्क म्हणून व्हावीत यादृष्टीने शासनाने लोकसेवा हक्क अधिनियम अंतर्गत अधिसूचित केलेल्या वीस सेवांच्या व्यतिरिक्त स्वतःहून अतिरिक्त ८० सेवा आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दिल्या जातात.

या कायद्याअंतर्गत गेल्या वर्षभरात साडेदहा लाख हून अधिक सेवा देऊन जिल्हाधिकारी कार्यालयाने एक उच्चांक प्रस्थापित केला आहे व त्याची नोंद राज्याचे मुख्य लोकसेवा हक्क आयुक्त यांनीदेखील घेतली आहे.

नागरिकांना गतिमान व पारदर्शी सेवा देण्याच्यादृष्टीने उचललेल्या या पावलासाठी जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन त्यांनी केले. जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून गंगापूर येथील एम. टी.डी.सी. ग्रेप पार्क रिसॉर्टचे उद्घाटन करण्यात आले. तसेच ग्रेप पार्क रिसॉर्टच्या जवळ तयार करण्यात आलेला बोट क्लब देखील पर्यटकांसाठी खुले करण्यात आले असून या माध्यमातून पर्यटन विकासाला चालना मिळत आहे.

नाशिक जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राला संपन्न असा क्रिडा वारसा लाभला आहे. अनेक राष्ट्रीय अंतरराष्ट्रीय खेळाडू आपण देशाला, जगाला दिले आहेत. चांदवडच्या गरीब कुटुंबातून खडतर परिस्थितीत शिक्षण घेत सैन्यदलात दाखल होऊन ऑलिम्पिक, आशियाई स्पर्धा गाजवणाऱ्या दत्तू भोकनळ यांनी अर्जुन पुरस्कार प्राप्त करून जिल्ह्याच्या क्रिडावैभवात अभूतपूर्व अशी भर घातली असल्याचे त्यांनी सांगितले.

विविध पुरस्कारांचे वितरण

याकार्यक्रमा दरम्यान पोलिस आयुक्तालयातील पोलिस उपनिरीक्षक समिरसिंह साळवे, यांना विशेष सेवा पदक देवून तर गुन्हे शाखेच्या आनंदा वाघ, प्रभाकर घाडगे, भिमराव गायकवाड, अनिल भालेराव, देवळाली कॅम्प येथील भगिरथ हांडोरे, विष्णू उगले, सुरेश माळोदे, प्रभाकर कोल्हे, देवराम सुरंजे, भारत पाटील, राजेंद्र ठाकरे या पोलिस अधिकारी व अमंलदार यांचा सन्मान चिन्ह देवून सत्कार करण्यात आला.

पोलिस पत्नीं व कुटुंबियांचा सत्कार

कोविड कालावधीत कर्तव्यावर असतांना मृत्यू आलेल्या पोलिस विभागातील अरूण टोंगारे (पोलिस हवालदार), सुनिल शिंदे (सहायक पोलिस उपनिरिक्षक), विजय शिंदे (पोलिस हवालदार), राजेंद्र ढिकले (पोलिस हवालदार), दिलीप भदाणे (सहायक पोलिस उपनिरिक्षक), निवृत्ती जाधव (पोलिस हवालदार), निवृत्ती बंगारे (पोलिस हवालदार) यांच्या पत्नी व कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला.

स्मार्ट ग्रामपंचायतींना पुरस्कार वितरण

जाखोरी (नाशिक) व भुत्याने (चांदवड) या ग्रामपंचायतीना जिल्ह्यात विभागून प्रथम पुरस्काराचे वितरण करण्यात आले. जाखोरी (नाशिक), भुत्याने (चांदवड), नांदेसर (येवला), खुंटेवाडी (देवळा), हनुमंत पाडा (पेठ), पाळे खुर्द (कळवण), लोखंडेवाडी (दिंडोरी), वडझिरे (सिन्नर), उभाडे (इगतपुरी), जळगांव खुर्द (नांदगाव), साकोरे मिग (निफाड), तोरंगण (ह) (त्र्यंबक), दहिंदुले (बागलाण), खोकरी (सुरगाणा), मुंगसे (मालेगाव) या ग्रामपंचायतींना स्मार्ट ग्राम योजनेंतर्गत पुरस्कार वितरण करण्यात आले आहे.

जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा पुरस्कार

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत तुषार भाऊसाहेब हिरे, कर्मवीर ॲड विठ्ठलराव हांडे जनता विद्यालय, चाटोरी, निफाड यास रूपये दहा हजार रुपयांचा प्रथम पुरस्कार, रिश्यु अजय पांडे, बी.वाय.के. कॉलेज ऑफ कॉमर्स, नाशिक पाच हजार रूपयांचा द्वितीय पुरस्कार, दिप्ती पाटील, आयुर्वेद महाविद्यालय आणि आरोग्य शाळा रूग्णालय, गणेशवाडी, नाशिक हिस दोन हजार 500 रूपयांचा तृतीय पुरस्कार तर मयुरी पंडीतराव अहिरे के.टी.एच.एम. कॉलेज, नाशिक व अंकिता सुदाम शिंदे यांना तृतीय पुरस्कार विभागून देण्यात आला आहे.

उल्लेखनीय कामगिरी बजावणारे रुग्णालये

डॉ. नगरकर यांचे एचसीजी मानवता प्रा. लिमिटेड, नामको चॅरिटेबल ट्रस्ट एसजीएस कॅन्सर हॉस्पीटल, एस.एम.बी.टी. इन्सस्टीट्युट ऑफ मेडिकल सायन्स ॲण्ड रिसर्च सेंटर, सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल, नाशिक, डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेज हॉस्पीटल ॲण्ड रिसर्च सेंटर, आडगावं, नाशिक, श्री. साईबाबा हार्ट इन्सस्टीट्युट ॲण्ड रिसर्च सेंटर, समर्थ चाईल्ड हॉस्पीटल, आयुष हॉस्पीटल, श्री गुरूजी रुग्णालय, सिक्स सिग्मा मेडिकेअर ॲण्ड रिसर्च लिमिटेड या रुग्णालयांचा महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य व प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत उल्लेखनीय कामगिरी केल्याने सन्मानीत करण्यात आले आहे.

जिल्हा क्रीडा पुरस्कार

डॉ. सुरेखा सुदाम दप्तरे यांना गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, दुर्गा प्रमोद देवरे वमंजुषा अशोक पगार यांना गुणवंत खेळाडू पुरस्कार महिला(थेट पुरस्कार), रनजित दिनेश शर्मा, गुणवंत खेळाडू पुरस्कार पुरूष (थेट पुरस्कार), भाग्यश्री दिपक चव्हाण गुणवंत खेळाडू पुरस्कार महिला, ऋत्विक राजेंद्र शिंदे गुणवंत खेळाडू पुरस्कार पुरूष, कु. स्वयंम विलास पाटील,गुणवंत खेळाडू पुरस्कार दिव्यांग खेळाडू, अथर्व ओंकार वैरागकर यांना राष्ट्रीय युवा महोत्सव पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

वीरपत्नीस ताम्रपटाने सन्मानीत

जिल्हा सैनिक कल्या अधिकारी कार्यालयामार्फत युद्धात शहिद झालेल्या नितीन पुरूषोत्तम भालेराव, असिटंट कमान्डट यांच्या वीरपत्नी रश्मी नितीन भालेराव यांना पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते ताम्रपट देवून सन्मानित करण्यात आले.

सामाजिक वनीकरण विभागाचे पुरस्कार

श्रीमती एस. एस. देशमुख, वनरक्षक, श्री. एस.एस. मुळीक, वाहन चालक विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण

शिष्यवृत्ती पुरस्कार

ग्रामीण भागातील भार्गव पंकज जाधव, इंग्लिश मिडीयम सेकेंडरी स्कूल, आराई बागलाण, शहरी भागातील अमनखान राजखान पठाण, सेक्रेडहार्ट कॉन्व्हेन्टस स्कूल, वडाळारोड, नाशिक, सी.बी.एस. ई./आय.सी.एस.ई. विभागाचे हर्षित विलास चोथे, अशोका युनिव्हर्सलस्कूल वडाळा, ओजस मनोज काबरा, एबिनेझर इंटरनॅशनल स्कूल, चांदशी नाशिक, अर्णव प्रमोद पाटील, नाशिक केंब्रिज प्राथमिक स्कूल इंदिरानगर नाशिक शहर या पूर्व उच्च प्राथमिक इयत्ता 5 वीच्या आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्त परीक्षा इयत्ता 8 वीच्या शहरी भागातून सोहम विनायक दुसाने, एम.एस.कोठारी अॅकेडमी नाशिक, सी.बी.एस.ई. व आय.सी.एस.ई. विभागातील खुशी राजेश कुचेरिया, सिम्बॉयसिस स्कूल, अश्विनीनगर नाशिक या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे पुरस्कारांचे वितरण करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या