Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यास्थायी सदस्य निवडीसाठी आज विशेष महासभा

स्थायी सदस्य निवडीसाठी आज विशेष महासभा

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या आठ सदस्यांची मुदत 28 फेब्रुवारी संपत असुन न्यायालयाच्या आदेशानुसार विद्यमान सदस्यातील भाजपच्या 9 सदस्यांपैकी एक सदस्य वगळून सेनेचा एक सदस्य निवडीसाठी आज (दि.24) सकाळी 11.30 वाजता व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे विशेष महासभा होणार आहे. यात नवीन स्थायी सदस्यांची निवड जाहीर केली जाणार असुन सत्ताधारी भाजपचे बहुमत जाणार असल्याने सभापती निवडणुक रंगणार आहे.

- Advertisement -

नाशिक महापालिकेची अर्थिक केंद्र असलेल्या स्थायी समितीत संख्याबळानुसार सत्ताधारी भाजपचे आत्तापर्यत 16 पैकी 9 सदस्य असल्याने या बहुमतांच्या जोरावर चार वर्ष सभापती पद भाजपकडे राहिले. मात्र भाजपचे दोन नगरसेवक कमी झाल्यामुळे त्यांच्या तौलाणिक बळानुसार स्थायीतील संख्याबळ 9 वरुन 8 झाले आहे. यासंदर्भात शिवसेनेचे अजय बोरस्ते व विलास शिंदे यांनी मुबंई उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने भाजपचे संख्याबळ एक ने कमी करुन सेनेचे संख्याबळ एकने वाढविण्यासंदर्भात आदेश दिले आहे.

या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी व 28 फेब्रुवारी रोजी स्थायीतील 8 सदस्य निवृत्त होत असुन त्यांच्या जागी नवीन 8 सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी महापौर सतिश कुलकर्णी यांनी उद्या विशेष महासभा बोलविली आहे. यात न्यायालयाच्या निर्देशानुसार सेनेचा एक सदस्य वाढविण्यासाठी भाजपचा एक सदस्य कमी करण्याचा निर्णय महापौर जाहीर करणार आहे. त्यानंतर निवृत्त होणार्‍या आठ सदस्याच्या जागी पक्षांकडुन आलेल्या 8 नावाची घोेषणा महापौर करणार आहे.

या निवडीनंतर स्थायीतील सत्ताधारी भाजपचे सदस्य संख्याबळ 9 वरुन 8 वर येणार आहे. यामुळे भाजप 8 व सर्व विरोधक सदस्य 8 अशी समसमान स्थिती होणार असल्याने भाजपसमोर सभापती पद टिकविण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. मात्र भाजपला मनसेनेने जर साथ दिली तर भाजपचा सभापती निश्चित मानला जात असुन विरोधक एकत्र येतील अशी शक्यता सध्या तरी दिसत नाही. तसेच सेनेकडुन सभापती पद खेचण्याच्या तयारीत नसल्याचे सांगण्यात येत आहे.

भाजप नवीन सदस्यांना संधी देणार

नाशिक महापालिकेत बहुमतात असलेल्या भाजपतील सर्वच नगरसेवकांना विविध पदावर आजपर्यत संधी देण्यात आलेली आहे. मात्र स्थायी समितीवर केवळ मोजक्या नगरसेवकांना संधी देण्यात आल्याने याठिकाणी जाण्यासाठी शेवटची संधी मिळावी म्हणुन ्रअनेकांचे प्रयत्न सुरु आहे. शेवटच्या स्थायी सभापती पद विरोधकांकडे जाण्याची शक्यता लक्षात घेऊन पक्षात स्थायीवरुन फुट पडु नये म्हणुन सर्वच आठ जागांवर नवीन नगरसेवकांना संधी देण्याचा निर्णय पक्षाने घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे.

यानुसार यंदाचे सभापती पद हे सातपूर किंवा नवीन नाशिक विभागात जाण्याची शक्यता असुन यादृष्टीने हालचाली सुरु झाल्या आहे. तसेच दुसर्‍या वर्षीही सभापती ताब्यात ठेवण्यासाठी सभापती गिते यांचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा बाहेर आली आहे. यामुळे सभापती पदाची निवडणुक रंगणार असली तरी उद्याच्या सदस्य निवडीतूनच नवीन सभापती निश्चित होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या