Video : नाशिक महापालिका हद्दीतील शाळा सुरु करण्याचा निर्णय ढकलला पुढे...

Video : नाशिक महापालिका हद्दीतील शाळा सुरु करण्याचा निर्णय ढकलला पुढे...

नाशिक | प्रतिनिधी Nashik

राज्य शासनाच्या सूचनेनुसार पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा 1 डिसेंबरपासून सुरू (Schools Reopen) होणार होत्या, मात्र करोनाच्या (Corona) नव्या व्हेरीयंटच्या पार्श्वभूमीवर शहरातील नाशिक महापालिका (Nashik NMC) हद्दीतील शाळा सुरू करण्याचा निर्णय 10 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. अशी माहिती महापालिका आयुक्त कैलास जाधव (Kailas Jadhav) यांनी दिली आहे...

दर सोमवारी महापालिकेच्या विभागप्रमुखांची बैठक आयोजित केली जाते. या बैठकीत महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी याबाबतच्या सूचना केल्या आहेत.

ते पुढे म्हणाले की, सुमारे अठरा वर्षानंतर नाशिकमध्ये होणाऱ्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची (Marathi Sahitya Sammelan) सर्वस्तरातून जोरदार तयारी होत आहे. नाशिकमध्ये म्हणजे आपल्या गावात होणाऱ्या या अभूतपूर्व सोहळ्यात महापालिकादेखील चांगला पुढाकार घेताना दिसत आहे.

नाशिकमध्ये येणाऱ्या व स्थानिक साहित्यिकांना साहित्य संमेलनापर्यंत सोडण्यासाठी व तेथून आणण्यासाठी मोफत बस सेवा पुरविण्यात येणार आहे. त्यासाठी 50 स्वतंत्र बसेसची सोय करण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिली आहे.

करोनाच्या नव्या व्हेरीयंटचे चित्र पाहून पुढील निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती महापालिका शिक्षणाधिकारी सुनिता धनगर यांनी 'देशदूत'शी बोलताना दिली.

Related Stories

No stories found.