Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिकच्या महापौरांना सोडवा लागणार 'रामायण' बंगला; 'हे' आहे कारण

नाशिकच्या महापौरांना सोडवा लागणार ‘रामायण’ बंगला; ‘हे’ आहे कारण

नाशिक । प्रतिनिधी Nashik

दोन दिवसांपूर्वी नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी समितीची मुदत संपली. या दिवशी दोन महत्त्वाच्या सभा होऊन सर्व कामकाजाचा निपटारा करण्यात आला तर नाशिक महानगरपालिकेच्या विद्यमान महापौरांची मुदत 15 मार्चपर्यंत आहे….(Nashik nmc)

- Advertisement -

यामुळे नाशिक महापालिका प्रशासन सतर्क झाले असून लवकरच महापौरांना याबाबत लेखी माहिती देण्यात येणार आहे. तसेच 15 मार्च रोजी रामायण बंगलासह (Ramayan Banglow) इतर सुविधा व प्रशासन आपल्या ताब्यात घेणार आहे. याबाबत महापालिका प्रशासनाकडून हालचाली देखील सुरू झाल्याचे दिसत आहे.

नवीन सदस्य महापालिकेत निवडून येतात व ज्या दिवशी महापौर (Mayor) निवडला जातो त्या दिवसापासून पाच वर्षे हा कार्यकाळ असतो. ही मुदत 15 मार्चला संपणार आहे.

यापूर्वी जर नवीन महापौर (new mayor) निवडून न आल्यास तसेच तोपर्यंत निवडणूक प्रक्रिया लांबली तर प्रशासक कारभार हाकणार आहे.

निवडणूक आयोगाच्या (Election Commission) सूचनेप्रमाणे महापालिकेने 44 प्रभाग आणि 133 नगरसेवक अशी रचना केली आहे. गत पंचवार्षिक निवडणूकच्या वेळी म्हणजे जानेवारी 2017 ला आदर्श आचारसंहितादेखील लागू होती.

मात्र, यंदा आतापर्यंत रक्षण देखील घोषित झालेले नाही तर आचारसंहिता कधी लागणार याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.

2017 मध्ये महापालिकेच्या सहाव्या पंचवार्षिक निवडणुकांसाठी 7 जानेवारी रोजी निवडणूक घोषित झाली होती. तसेच 21 फेब्रुवारीला मतदान झाले होते, तर 14 मार्च 2017 रोजी महापौरपदाची निवडणूक झाली होती.

महापालिकेतील अधिनियमातील तरतुदीनुसार नवीन निर्वाचित झालेल्या नगरसेवकांची पहिली सभा ज्या दिवशी होते, त्या दिवशीपासून पाच वर्षे गृहीत धरले जातात.

त्यानुसार सध्याच्या नगरसेवकांची मुदत 14 मार्च रोजी संपणार आहे. त्यामुळे तसे पत्र नगरसचिवांकडून महापौरांसह सर्व पदाधिकार्‍यांना दिले जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर 15 मार्च रेाजी सर्व पदाधिकार्‍यांची कार्यालये सील करण्याची कारवाई होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या