Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यायेवला आगारातील चालक करोना पॉझिटिव्ह

येवला आगारातील चालक करोना पॉझिटिव्ह

येवला | प्रतिनिधी

राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) दिलेल्या आदेशानुसार, येवला आगारातील सुमारे तिस चालक वाहक मुंबई येथे बेस्टच्या तात्पुरत्या सेवेत रुजू झाले होते. त्यातील एका कर्मचाऱ्याला करोनाची लागण झाली असून यामुळे येवला आगारातील कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

- Advertisement -

येवला बस आगारातील १५ चालक व १५ वाहक १२ ऑक्टोबर रोजी तात्पुरत्या स्वरूपात मुंबई येथे एसटीची सेवा बजावण्यासाठी गेले होते.

आठ दिवस आपले कर्तव्य बजावून हे कर्मचारी नियोजित वेळेनुसार आपापल्या घरी परतले त्यानंतर यातील एका कर्मचाऱ्याला लक्षणे जाणवू लागल्याने व त्रास वाढल्याने त्याची करोना चाचणी करण्यात आली.

या कर्मचा-याचा अहवाल पाॅझिटिव्ह आला असून त्याला कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. या प्रकाराने येवला आगारात एकच खळबळ उडाली असून मुंबई येथे कर्तव्यावर जाण्यास कर्मचारी नाखूष असल्याचे दिसत आहेत.

मुंबई येथे वाहतूक सेवेसाठी गेले असताना करोनाची बाधा झाल्याने चालक आणि वाहकात घबराट पसरली आहे.

मुंबईत उपनगरीय लोकल सेवा बंद असल्याने बेस्टच्या प्रवासी वाहतुकीसाठी सेवा बजावणा-या चालक आणि वाहकांवर मोठा ताण आहे.

तो कमी करण्यासाठी राज्यातील सर्व एसटी बस स्थानकातून प्रत्येकी दहा गाड्यासह चालक व वाहक मुंबईत प्रवासी वाहतुकीची सेवा देण्यास पाठविण्यात आले होते. यातील एका कर्मचाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने इतर कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या