Saturday, April 27, 2024
Homeनाशिकयेवला तालुक्यातील जवानाला सीमेवर वीरमरण

येवला तालुक्यातील जवानाला सीमेवर वीरमरण

नाशिक | प्रतिनिधी Nashik

येवला तालुक्यातील (yeola) चिचोंडी गावचे (chichondi gaon) भूमिपुत्र भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले मेजर नारायण मढवई यांना देशसेवेचे कर्तव्य बजावत असतांना वीरमरण आले. या घटनेमुळे संपूर्ण नशिक जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.

- Advertisement -

अतिशय दुःख घटना घडली आहे. शेतकरी कुटुंबातून पुढे येत सैन्यदलात भरती झालेले नारायण मढवई (Narayan Madhvai) यांनी सैन्यदलात अतिशय उत्कृष्ठ अशी कामगिरी बजावली. त्यांच्या निधनाने भारतमातेने एक वीर सुपुत्र गमावला आहे.

त्यांच्या निधनाने मढवई कुटुंबासोबतच संपूर्ण तालुक्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून मी व माझे कुटुंबीय शहीद जवान मेजर नारायण मढवई (mejar narayan madhavai) यांच्या दुःखात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो. अशी प्रतिक्रिया अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या