नाशिक | प्रतिनिधी

महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण अकादमी (एमपीए) गरोदर महिलेच्या आत्महत्येच्या घटनेने हादरले आहे. ३० वर्षीय गरोदर असलेल्या महिलेने काल (दि १७) दुपारी ३ वाजेच्या दरम्यान गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली...

पल्लवी प्रमोद गायकवाड (रा. एमपीए कर्मचारी वसाहत) असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे.

याबाबत जितेंद्र गोपीनाथ दिवे या पोलीस कर्मचाऱ्याने फिर्याद दिली असून यानुसार गंगापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

त्यानुसार, मयत महिलेने घरी कोणीही नसताना घराच्या छताच्या पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास लाऊन घेत आत्महत्या केली.

दरम्यान, ही महिला पाच ते सहा महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कोकाटे करत आहेत.