सॅनिटायझरचा भडका; महिलेचा मृत्यू
मुख्य बातम्या

सॅनिटायझरचा भडका; महिलेचा मृत्यू

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक । प्रतिनिधी Nashik

घरात सॅनिटायझर मारत असताना अचानक भडका उडाल्याने महिला गंभीर भाजली होती. दरम्यान, या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना वडाळागावात घडली.

रजबीया शाहिद शेख (रा. मेहबुबनगर, वडाळागाव) असे या घटनेत मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 जुलै रोजी रात्री विज गेली असताना घरात मेनबत्ती पेटवण्यात आली होती.

याच वेळी शेख या घरात सॅनिटायझर मारत असताना अचानक सॅनिटायझरने पेट घेतला. यामध्ये शेख या 90 टक्के भाजल्या होत्या.

त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पोलीस हवालदार राणे अधिक तपास करत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com