Photo : विसर्ग घटला; गोदातीरी जनजीवन पूर्वपदावर

Photo : विसर्ग घटला; गोदातीरी जनजीवन पूर्वपदावर

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिकमधील यंदाच्या हंगामातील पहिला पूर (Flood in Nashik) ओसरला आहे. पावसाची संततधार थांबल्यामुळे रात्रीतून अनेक धरणातील विसर्ग कमी करण्यात आला आहे. त्यामुळे गोदातीर पुन्हा एकदा पूर्वपदावर येत आहे. व्यावसायिकांनी दुकाने हलविण्यास सुरुवात केली आहे. आज गोदाघाटावर धार्मिक विधीही पार पडले...

गोदावरी नदीचे पाणी कमी (Godavari River Water) झाल्यामुळे अनेकांनी गंगेच्या पाण्यात डुबकीही मारली. सद्यस्थितीत दारणा धरणातून (Darna Dam) २ हजार ७०८ क्युसेक, गंगापूर धरणातून (Gangapur Dam) १ हजर १३६ क्युसेक, वालदेवीतून (Waldevi Dam) ५९९, गौतमी गोदावरीतून (Gautami Godavari Dam) १००, कश्यपी धरणातून (Kashyapi Dam) १५० क्युसेक आणि आळंदीतून (Alandi Dam) १२० क्युसेक विसर्ग करण्यात येत आहे.

पहिल्या पावसात अधिक घनकचरा वाहून आल्यामुळे महापालिकेने (Nashik Municipal Corporation) तब्बल दोन टन कचरा उचलला होता. मात्र, आता गोदातीर पूर्णपणे स्वच्छ आहे. याठिकाणी गाळही दिसत नाही, तसेच पानवेलीसह कचराही गोदाकाठी नसल्याने महापालिकेला दिलासा मिळाला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com