गोदामाई खळाळली; एक हजार क्युसेकने होतोय विसर्ग

गोदामाई खळाळली; एक हजार क्युसेकने होतोय विसर्ग

प्रतिनिधी । नाशिक

यंदा सर्वत्र समाधानकारक पडलेल्या पावसामुळे जलाशयांतही मुबलक पाणी आहे. त्यामुळे पिण्यासह सिंचनाला आणि उद्योगांनाही मागणीनुसार पाणी देण्यात आले असून, त्याची आवर्तनेही निश्चित झाली आहे...

त्यानुसार गंगापूर धरणातून देण्यात येणाऱ्या रब्बीसाठीचे पहिले आवर्तन नववर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे आज सोडण्यात आले.

आज सकाळी ६ वाजता धरणांतून ८०० ते १००० क्युसेकने पाणी सोडण्यास सुरुवात केल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आली.

गोदावरी कालवे आणि एकलहरे आैष्णिक विद्युत केंद्रासाठी हे पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी नदी पात्रात, प्रवाहात उतरु नये असे आवाहन नाशिक पाटंबधारे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com