Video: केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार लग्नघरी लाटत होत्या पुऱ्या; व्हिडीओ व्हायरल

नाशिक | प्रतिनिधी Nashik

लग्नाची घाई गडबड, घरात आप्त स्वकीयांचा वावर लग्नाच्या विविध प्रथेप्रमाणे सर्व गोष्टींची तयारी ही होत असते, याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून पुऱ्या लाटण्याचा कार्यक्रमदेखील असतो...

अशाच एका लग्नसोहळ्याला जाने शक्य नसल्यामुळे डॉ भारती पवार यांनी चांदवड तालुक्यातील देनेवाडी गावातील सामाजिक कार्यकर्ते प्रगतिशील शेतकरी शिवाजी मोरे यांच्या मुलीच्या लग्नानिमित्त हजेरी लावली.

लग्नघरी जाऊन शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी योगायोगाने पुऱ्या लाटण्याचा कार्यक्रम सुरू होता. त्याठिकाणी मंत्रीमहोदया आपला कुठलाही बडेजाव न दाखवता पुऱ्या लाटण्यासाठी बसल्या. मग सर्वांच्या उत्साहाला उधानच आले लग्नाची गाणी सुरू झाली.

नवरी येऊन बसली सर्वच पुऱ्या लाटण्यात मग्न झाले. आपल्या मुलीच्या लग्नात स्वतः मंत्रीमहोदया आठवणीने आल्या आणि घरच्या महिलांसोबत कार्यक्रमात सहभागी झाल्या हे बघून नवऱ्या मुलीच्या बापाचा उर आनंदाने भरून आला.

डॉ. पवार एवढ्या मोठ्या पदावर जाऊन सुद्धा कुठलाही गर्व बडेजाव न मिरवता आपले पाय जमिनीवरच असल्याचे या प्रसंगातून दाखवून दिले. ताईंच्या पुऱ्या लाटण्याची चर्चा तालुक्यातच नव्हे तर सर्वदूर पसरली असून हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com