नाशिकच्या 'या' तीन तालुक्यांत निर्बंध कडक; अशी आहे नियमावली

नाशिकच्या 'या' तीन तालुक्यांत निर्बंध कडक; अशी आहे नियमावली

नाशिक । प्रतिनिधी Nashik

निफाड (Niphad), येवला (Yeola), सिन्नर (Sinnar) तालुक्यात कोरोना आटोक्यात आणण्यासाठी निर्बंध कठोर करण्यास सुरवात झाली आहे. आज जिल्हाधिकारी सुरज मांढरे (Collector Suraj Mandhare) यांनी नव्याने आदेश काढुन कार्यवाहीच्या सुचना दिल्या. नियमांचे पालन न करणार्‍‌‌या आस्थापना व व्यक्ती यांच्या विरुद्ध कारवाई करावी असे त्यांनी म्हटले आहे....

वरील तिन्ही तालुक्यत बाजारांच्या निमित्ताने होणारी गर्दी पाहता ग्राहकांची संख्या जास्त असलेल्या सर्व आस्थापनांमध्ये थर्मल गन (tharmel gun) व पल्स ऑक्सिमीटरद्वारे (pulse oximeter) ग्राहकांची तपासणी व त्याबाबतची नोंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

लक्षणे असलेले नागरिक अशा ठिकाणी आढळून आल्यास त्यांना टेस्टसाठी रुग्णालयात पाठवण्याच्या सूचना संबंधित आस्थापना चालकांना द्याव्यात असे म्हटले आाहे.

कॉन्टॅक्ट ट्रेसिंग (Contact Stressing) एखादी अस्थापना वारंवार येत असल्याचे निदर्शनास आले तर संबंधित अस्थापना बंद करण्याची कार्यवाही करावी. गृह विलगीकरणात असलेल्या व्यक्तींची तपासणी करून त्या ठिकाणी गृह विलगीकरणाचे सर्व नियम पालन करण्यात येत असल्याची खात्री करावी अन्यथा सदर रुग्णास नजिकच्या सीसीसी केंद्रात त्यांना दाखल करावे.

कॉन्टॅक्ट ट्रेसिंग मध्ये येणार्‌या व्यक्तींची कोविड चाचणी (Covid Test Compulsory) करणे बंधनकारक करावी, परंतु त्या व्यतिरिक्त प्रत्येक तालुक्यांतील हॉटस्पॉट निश्चित करून तेथे फिरणार्‌या व लक्षणे असणान्या सर्व व्यक्तींची कोविड टेस्ट करून घेण्याची व्यवस्था त्या हॉटस्पॉटच्या आस्थापना चालकांच्या मदतीने स्थापित करावी. त्यासाठी चाचणीची ठिकाणे निश्चित करून त्यास प्रसिद्धीही देण्यात यावी.

तालुक्यामधील संसर्गाची ठिकाणे निश्चित करून सर्व विभागाच्या समन्वयाने नियमांचे पालन होत असल्याची खात्री करावी. तसेच नियमांचे पालन न करणार्‍‌‌या आस्थापना व व्यक्ती यांच्या विरुद्ध कारवाई करावी. दर आठवड्याला प्रातांंनी बैठका घेऊन केाठेे रुग्ण वाढत आहे? का वाढत आहे?. याची कारण मिमांसा करावी बाजार समित्यांमध्ये पोलिस अधिकाऱ्यांनी भेटी देऊन गर्दीवर नियंत्रण आणावे, असे आदेशात म्हटले आहे.

Related Stories

No stories found.