Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्या'युपीएससी' परीक्षेत नाशिकच्या तिघांचा डंका

‘युपीएससी’ परीक्षेत नाशिकच्या तिघांचा डंका

नाशिक | प्रतिनिधी Nashik

केंद्रीय लोकसेवा आयोगाचा (UPSC) निकाल नुकताच जाहीर झाला. यात महाराष्ट्रातील 100 हून अधिक उमेदवार यशस्वी झाले आहेत. नाशिकच्याही त्रिकुटाने या परीक्षेत सुयश प्राप्त करत नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवण्यात यश आले…. (Nashik UPSC Candidates)

- Advertisement -

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत देशातील एकूण 761 उमेदवारांपैकी 100 हून अधिक महाराष्ट्रातील उमदेवारांनी यश संपादन केले. राज्यातून मृणाली जोशी प्रथम तर विनायक नरवाडे दूस-या क्रमांकावर आहे. देशभरातील गुणानूक्रमानुसार हे दोघे 36 आणि 37 व्या स्थानावर आहेत. तर नाशिकच्या दिव्या गुंडे हिला ३३८ क्रमांक मिळाला तर निवृत्ती आव्हाड हे १६६ क्रमांकावर राहिले आहेत. यामध्ये देवळा तालुक्यातील सुदर्शन सोनवणे हे ६९१ क्रमांकवर राहिले.

आता पाहूयात नाशिकच्या तीनही हिऱ्यांची थोडक्यात माहिती

दिव्या गुंडे, नाशिक

दहावीत ९२ गुण मिळवूनदेखील दिव्या यांनी कला शाखेत प्रवेश घेतला. दिव्याचे आई व वडील प्रशासकीय सेवेत आहेत.

दिव्याने शालेय शिक्षण फ्रावशी अकादमीत केले. आयसीएसई बोर्डातून तिने दहावीत ९२ टक्के गुणांसह प्राविण्य मिळवले. अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगताना तिने कला शाखेची निवड केली.

बारावीपर्यंतचे शिक्षण तिचे एचपीटी महाविद्यालयात झाले. पुढे पदवीसाठी पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजला ती गेली. त्यानंतर अंतिम वर्षात होती तेव्हापासून तिने स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाला सुरुवात केली. दिव्याच्या आई गोंदियाच्या जिल्हाधिकारी आहेत तर वडील हे नाशकात जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.

सुदर्शन सोनवणे (लोहोणेर तालुका देवळा)

आयुष्यात अपयश आले तर अनेकजण मार्ग बदलतात किंवा डिप्रेशनमध्ये जातात. पण देवळा तालुक्यातील लोहोणेर येथील सुदर्शनने तब्बल सहा वेळा अपयश पचवले. आणि तेव्हढ्याच जोमाने अभ्यास करत युपीएससी परीक्षेत सुयश प्राप्त करत अधिकारी पदाला गवसणी घातली.

सुदर्शनचे बारावीपर्यंतचे शिक्षण दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथे झाले. पुढे नाशिक आणि पुणे येथे त्याचे पुढील शिक्षण झाले. सुदर्शनचे वडील राज्य परिवहन महामंडळात चालक आहेत. तर आई गृहिणी आहेत. अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून त्याने यश संपादन केले. किती तास अभ्यासापेक्षा अभ्यासाची गुणवत्ता दर्जेदार असावी असे तो सांगतो.

निवृत्ती आव्हाड (गुळवंच तालुका सिन्नर)

सिन्नर तालुक्यातील गुळवंच येथील भूमिपुत्र आणि मध्यप्रदेशातील जबलपूर येथे सहायक आयकर आयुक्त म्हणून कार्यरत असलेले निवृत्ती आव्हाड यांनी पुन्हा एड युपीएससी परीक्षा उत्तीर्ण होत आयएएसपदाला गवसणी घातली. सलग पाच वेळा त्यांनी मुलाखत दिली.सहाव्या प्रयत्नात त्यांनी यश संपादन केले. त्यांना १६६ वी रंक मिळाली.

- Advertisment -

ताज्या बातम्या