Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्याNashik News : गंगापूर धरणातून विसर्ग वाढवला

Nashik News : गंगापूर धरणातून विसर्ग वाढवला

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक जिल्ह्यात आज सायंकाळी पाचच्या सुमारास विजांच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस कोसळला. पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे. मुसळधार पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. सायंकाळपासून सुरु झालेला पाऊस अजूनही सुरुच आहे…

- Advertisement -

गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरु आहे. यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. रात्री 9.00 वा. 3318 क्यूसेस विसर्ग होता. तो रात्री 11.00 वा. 3434 ने वाढवून 6752 क्यूसेस करण्यात आल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे.

Nashik Accident News : लक्झरी बस-कारची समोरासमोर धडक

दरम्यान, करंजवण धरण पूर्ण क्षमतेने भरले असून आज रात्री ९ वाजता धरणातून कादवा नदी मध्ये ३०१ क्युसेस इतका पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. तसेच पालखेड धरणातून सध्या २१८ क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Video : करंजवण धरण ओव्हरफ्लो, ‘इतक्या’ पाण्याचा विसर्ग

- Advertisment -

ताज्या बातम्या