वाद शमणार?; 'त्या' शिक्षकाची बदली करा आम्ही एकत्र काम करू शकत नाही...

वाद शमणार?; 'त्या' शिक्षकाची बदली करा आम्ही एकत्र काम करू शकत नाही...

ओझे | वार्ताहर Oze Dindori

दिंडोरी तालुक्यातील कादवा म्हाळुंगी (Kadva Mhalungi) जि. प. शाळेत (ZP School) दोन दिवसापूर्वी मुख्याध्यापक व शिक्षकात झालेल्या वाद शमण्याची शक्यता आहे. मारहाण झालेल्या मुख्याध्यापकांनी मारहाण केलेल्या शिक्षकाची त्वरित बदली करण्याची मागणी केली असून आम्ही एकत्रित काम करू शकणार नसल्याचे म्हटले आहे. अद्याप याबाबत प्रशासनाकडून कुठलेही स्पष्टीकरण आलेले नाही....

वाद शमणार?; 'त्या' शिक्षकाची बदली करा आम्ही एकत्र काम करू शकत नाही...
मारहाण होवूनही बाचाबाची झाल्याची नोंद, वरिष्ठांकडून आश्चर्यकारक दबाव...?

वाद झाल्यापासून दोन्ही बाजूने दिंडोरी पोलिस ठाण्यात (Dindori Police Station) गुन्हा नोंद झालेला नाही. दोन्ही शिक्षकामधील वाद मिटविण्यासाठी अनेक शिक्षक मध्यस्थी करत आहेत. त्यामुळे वाद मिटणार हे जवळ जवळ निश्चित असल्याचे बोलले जात आहे.

पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद न झाल्यांमुळे प्रशासकीय पातळीवर जि.प. शिक्षणविभाग काय भूमिका घेणार हे अजुन स्पष्ट झालेले नसले तरी वाद झाल्यानंतर काही वेळात घटनास्थळी विस्तारअधिकारी, केंद्रप्रमुख व शिक्षण विभागातील अन्य अधिकारी घटनास्थळी जाऊन वाद मिटवला होता.

परंतु नंतर सोशल मिडियावर मुख्याध्यापक भास्कर जाधव यांच्या मारहाणीचे फोटो व्हायरल झाल्यामुळे प्रकरणाला वेगळे वळण लागले होते. आज कादवा म्हाळुंगी येथील प्रभारी मुख्याध्यापक भास्कर जाधव यांच्याशी संपर्क साधला असता प्रकरण मिटवणार असल्याचे सांगितले.

आमच्यात जरी वाद झाला असला तरी मारहाण केलेल्या शिक्षकाचा भविष्याचा विचार करता मी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला नाही. कारण गुन्हा नोंदविल्यानंतर या शिक्षकांचे निलंबन होऊ शकते. तसेच या शिक्षकाचे भविष्याचे नुकसान होऊ शकते. परंतु मारहाण केलेल्या शिक्षकाची कादवा म्हाळुंगी येथून त्वरित बदली करावी आम्ही एकत्र काम करू शकत नाही.

भास्कर जाधव, प्रभारी मुख्याध्यापक कादवा म्हाळुंगी

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com