साठवण बंधाऱ्याला भगदाड; लाखो लिटर पाणी नार नदीत गेले वाहून

साठवण बंधाऱ्याला भगदाड; लाखो लिटर पाणी नार नदीत गेले वाहून

जलतरण स्पर्धेआधीच घटना घडल्याने मोठा अनर्थ टळला

नाशिक | प्रतिनिधी nashik

सुरगाणा तालुक्यातील (Surgana) आदिवासी उपयोजनेच्या सिमेंट प्लग साठवण बंधाऱ्याला (Cement Plug water storage canal) आज सकाळी नऊच्या सुमारास भगदाड पडले. या घटनेत लाखो लिटर पाणी वाहून गेले. हा बंधारा फुटला की फोडला याबाबत चौकशीची मागणी केली जात आहे. (demand for inquiry about canal broken) दुसरीकडे, याच बंधाऱ्यात जलतरण स्पर्धांचे आयोजन (Swimming Competition) करण्यात आले होते, स्पर्धेआधीच अशी घटना घडल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे...

या घटनेत लाखो लिटर पाणी नार नदीच्या पात्रात वाहून गेले आहे. संक्रांत निमित्त लोकशाही युवा मंचच्या वतीने संक्रांत निमित्ताने तालुक्यातील युवकांसाठी जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

सकाळीच तालुक्यातील पोहण्याची आवड असलेले तरूण या सिमेंट प्लग साठवण बंधाऱ्याजवळ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जमा झाले होते.

सापुतारा (Saputara) येथून स्पर्धेकरीता होडी आणून ठेवलेली होती. लाखो लिटर पाणी नार नदीच्या पात्रात वाहून गेल्याने स्पर्धाकांचा हिरमोड झाला. स्पर्धा आयोजनाच्याच दिवशी ही घटना झाल्याने नागरिकांमध्ये बंधारा फोडला की फुटला अशी चर्चा रंगली होती. मात्र साठवण बंधाऱ्यातील पाण्याचा दाब वाढत गेल्याने भगदाड पडल्याचे सांगण्यात येत आहे.

याच साठवण बंधाऱ्याच्या भरवशावर हजारो शेतकऱ्यांनी खरीप हंगामात गहू, कांदे, हरभरा, भाजीपाला पिकांची लागवड केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. (Possibility of crop damaged)

या पिकांसाठी उन्हाळ्यात पाण्याची कमतरता भासणार आहे. सिमेंट बंधाऱ्याची भिंत भक्कम बांधली असली तरी साठवण बंधाऱ्याच्या टोकाजवळ ची माती खंगाळ, केवटाळ दगड गोटे, मुरुम, वाळू मिश्रीत लुसलुशीत ठिसूळ सारखी माती असल्याने डाव्या बाजूच्या टोकालाच पाणी साठल्याने थोड्या फार प्रमाणात लिकेज् झाल्याचे निदर्शनास आले आहे.

जस जसे पाण्याचा साठा वाढत गेला तसे पाण्याचा दाब भूपृष्ठावर वाढल्याने तेथील माती वाहून गेल्याने भगदाड पडल्याचे तेथील नागरिकांनी सांगितले.

पाऊस नसतांना नार नदीच्या प्रवाहात पाण्याची पातळी वाढल्याने नदी पावसाळ्यात वाहते तशी दुथडी भरून वाहत होती. काही काळ पुरस्थिती निर्माण झाल्याने काठावरील गावांना अनेक नागरिकांनी भ्रमणध्वनीद्वारे बंधारा फुटल्याची कल्पना दिल्याने जिवितहानी टळली.

संबंधित विभागाने तात्काळ दुरुस्ती करून गळती थांबवावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

सिमेंट प्लग साठवण बंधाऱ्याचे अंदाज पत्रकीय रक्कम ५० लक्ष रुपये आहे. त्यानुसार काम दर्जेदार केले असून दोन्ही टोकावरील माती ओली झाली खाली ठिसूळ माती असल्याने नार नदीचे प्रवाहाचे पात्र खुप मोठे असल्याने भरपूर प्रमाणात पाण्याची साठवण झाली होती. टोकावरील जागेत वाळू मिश्रीत माती असल्याने भगदाड पडले आहे.तात्काळ दुरुस्ती करून गळती थांबविण्यात येईल. शेतक-यांची गैरसोय केली जाणार नाही.

- दिपक काटकर, मक्तेदार

खोळंबा येथील सिमेंट प्लग साठवण बंधाऱ्याचे काम ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे केले असून आदिवासी उपयोजनेचे लाखो रुपये पाण्यात गेले आहेत.या बाबतीत लवकरच तालुक्यातील शिष्टमंडळ आदिवासी विकास मंत्री व जलसंपदा मंत्री यांची भेट घेणार आहे.संबंधित मक्तेदाराने तात्काळ दुरुस्ती करून गळती थांबवावी व शेतक-यांची गैरसोय थांबवावी.

नितीन पवार, आमदार

पाऊस नसतांना भर उन्हाळ्यात सिमेंट प्लग बंधा-याचा भराव वाहून गेलाच कसा ? याचा अर्थ काम निकृष्ट दर्जाचे केले आहे. शेतक-यांचे पाण्या अभावी पिकांचे नुकसान होणार आहे याला जबाबदार कोण? याची वरिष्ठ स्तरावरून चोकशी करण्यात येऊन संबंधित ठेकेदाराला यापुढे काम न देता काळ्या यादीत नाव समाविष्ट करण्यात यावे. या निकृष्ट दर्जाचे कामामुळे आदिवासींचे लाखो रुपये पाण्यात गेले आहेत.बंधा-याची तात्काळ दुरुस्ती करून गळती थांबवून शेतक-यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध करून द्यावे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com