Video : रस्ता होता तिथवर धावली १०८ ; पुढे सुरु होतो मृत्यूशय्येवरचा खरा प्रवास

Video : रस्ता होता तिथवर धावली १०८ ; पुढे सुरु होतो मृत्यूशय्येवरचा खरा प्रवास

पेठ तालुक्यातील विदारक परिस्थिती

पेठ | सुनील धोंडगे Peth

पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या बळीराजाला दिलासा मिळाला आहे. (Rain in Peth) गेली तीन-चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरु असल्याने अनेक भागात जनजीवन विस्कळीत झालेले बघायला मिळते आहे. गेल्या २४ तासात ९७ मि.मी. पावसाची नोंद झाली. नदी नाले तुडुंब भरल्याने व त्यातच अनेक लहान पुलांवरुम पाणी वाहत असल्याने अनेक मार्ग पाण्याखाली गेले आहेत....

नदीचा धडकी भरविणारा प्रवाहात पुलाचा फुटभर रुंद पुलावरुण नवजात बालकास छातीशी कवटाळून तर प्रसुत मातेस लाकडास झोळी बांधून प्रचंड प्रवाहाची पर्वा न करता पैलतीरावर जाण्यासाठी जिव धोक्यात घालून प्रवास करावा लागला. येथील खडकी (Khadaki) गावाजवळील करवळपाडा (Karawalpada) या दिडशे लोकसंख्या असणाऱ्या गावातील गाडर कुटुंबीयांनी नुकतेच प्रसुत झालेल्या वेणूबाईस घराकडे नेतांना नाकीनऊ आले.

पेठच्या ग्रामीण रुग्णालयात (Peth Rural Hospital) ७ सप्टेंबर रोजी येथील एका महिलेची प्रसूती झाली. वेणू ज्ञानेश्वर जाडर या महिलेस १०८ अब्युलंसने जेमतेम रस्ता असणाऱ्या खडकी गावापर्यंत नेण्यात आले. मात्र, तेथून करवळपाडा गाव गाठायचे होते. या गावात जाण्यासाठी रस्ता नाही. पावसाची संततधार सुरु असल्याने नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. असे असताना नदीत बांधलेल्या केटीवेअर (Kolhapur Type Wear) बंधाऱ्याच्या भिंतीवरुन या महिलेला घरापर्यंत नेण्याची कसरत सुरु झाली होती.

मात्र, पावसाळ्यात नार नदीचे पात्र उफाळून येत असतांना पैलतीर गाठणे अत्यंत जोखमीचे होते. रुग्णाला अवघडलेल्या परिस्थीतीचा सामना करणे म्हणजे साक्षात मृत्युशी झुंजच अशीच इथली परिस्थिती असते. उफाळून वाहणाऱ्या नदी पात्रातून गतवर्षी शंकर पिठले (Shankar Pithale) नावाचा व्यक्ती मयत झाल्यावर त्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नेहमीच्या स्मशानभूमीत आणण्यासाठी मृतदेह टायरवर टाकून आणण्यात आला होता.

मात्र, या सर्व समस्याच्या सामना करण्याची मानसिकता त्यांच्यात असली तरीही आपल्याच बांधवाना किमान अन्न, वस्त्र, निवारा व वाहतुकीच्या सुविधा मिळणे हा त्यांचा हक्क मात्र अजून प्राप्त झालेला नाही अशीच इथली काही शिक्षित मंडळी म्हणते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com