Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याएसटी कर्मचारी पगाराविनाच; जूनचाही पगार थकला

एसटी कर्मचारी पगाराविनाच; जूनचाही पगार थकला

नाशिक | प्रतिनिधी Nashik

गेल्या तीन महिन्यांपासून राज्य परिवहन महामंडळाचे उत्पन्न बंद झाले आहे. आधीच ताेट्यात असलेल्या महामंडळाने सवलतीच्या रकमांमधून कर्मचाऱ्यांचे माहे एप्रिल व मे महिन्याचे पगार भागविले. मात्र आता एसटीकडे (ST) काेणतेही पेैसे शिल्लक नसून २० जुलै उलटूनही कर्मचाऱ्यांचे जून महिन्याचे पगार झालेले नाहीत. त्यामुळे कसे जगायचे असा यक्ष प्रश्न एक लाखांहून आधिक कर्मचाऱ्यांना पडला आहे.

- Advertisement -

अर्धा जुलै महिना लाेटला तरी एसटी कर्मचाऱ्यांचे पगार अजूनही न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरत आहे. दरम्यान, शासनाने एस.टी. कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ५०० कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी इंटकचेे अध्यक्ष माजी आमदार जयप्रकाश छाजेड व सरचिटणीस मुकेश तिगाेटे यांनी केली आहे. कर्मचाऱ्यांचे पगार व महामंडळाला उभारी मिळण्यासाठी सर्व पक्षाच्या एसटी संघटना व युनियनने एकी दाखविणे गरजेचे आहे, असे आवाहन महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे हिरेन रेडकर यांनी केले आहे.

१५ जुलै उलटला तरी अद्याप जूनचा पगार कर्मचाऱ्यांना मिळालेला नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. महाराष्ट्र शासनाने मे महिन्याचे ५० टक्के व जून महिन्याच्या संपूर्ण वेतनासाठी ५०० कोटी रुपये तत्काळ देण्याची मागणी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेचे यांनी केली आहे. महामंडळाचे दररोज २२ कोटी रुपयांचे उत्पन्न बुडत असून २,३०० कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

एसटीला ५०० काेटी रूपये मिळावे, या मागणीसाठी पाठपुरावा सुरू असून परिवहन मंत्री अनिल परब व राज्यमंत्री सतेज पाटील हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतील. कर्मचाऱ्यांचा दिड महिन्यापासून पगार नाही. मे महिन्याचा ५० टक्के पगार झाला. जूनचा पगार २० जुलै उलटूनही झालेला नाही. कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.

मुकेश तिगाेटे, सरचिटणीस, इंटक

एसटीला उभारी मिळावी व कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एसटीला एक ते दाेन हजार काेटी रुपये द्यावेत. तसेच सर्व २२ युनियन व संघटनांनी हेवेदावे बाजूला ठेऊन एकत्र यावे असे आवाहन महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे हिरेन रेडकर यांनी केले आहे

देवा सांगळे, महाराष्ट्र एसटी कामगार सेना, विभागीय सचिव, नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या