Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याजम्मू काश्मीरमध्ये सटाणा येथील जवानाचा मृत्यू

जम्मू काश्मीरमध्ये सटाणा येथील जवानाचा मृत्यू

सटाणा | ता प्र

देशसेवेसाठी सीमेवर तैनात असलेले बागलाणचे सुपुत्र कुलदीप जाधव यांचा मृत्यू झाल्याची दुःखदायक घटना घडली आहे.

- Advertisement -

आठ दिवसांपूर्वीच त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाल्याने रविवारपासून ते सुट्टी घेऊन घरी येणार होते. मात्र मुलाला पाहण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही.

कुलदीप जाधव हे चार वर्षांपासून सैन्यात भरती झाले होते. जम्मू काश्मीरच्या राजोरी सेक्टरमध्ये ते तैनात होते. या परिसरात प्रचंड थंडी असल्याने झोपेतच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती भारतीय सैन्यदलाने सटाणा पोलीस ठाण्याला दिली आहे.

कुलदीप जाधव यांचे मुळगांव पिंगळवाडे असून लहानपनापासून ते सटाणा शहरातील भाक्षी रोड येथे वास्तव्यास होते. जाधव यांच्या पश्चात आठ दिवसांचा मुलगा, पत्नी, आई-वडील, एक भाऊ असा परिवार आहे.

उद्या रविवारी उशिरा किंवा सोमवारी सटाणा येथे शासकीय इतमामात जाधव यांच्यावर अंतिम संस्कार होणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या