नाशिक जिल्ह्यातील सहा नगरपंचायातींसाठी मतदान सुरु; कुठे काय परिस्थिती पाहा

नाशिक जिल्ह्यातील सहा नगरपंचायातींसाठी मतदान सुरु; कुठे काय परिस्थिती पाहा

नाशिक | प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यातील निफाड, पेठ, सुरगाणा, देवळा, दिंडोरी आणि कळवण नगरपंचायतींच्या 87 जागांसाठी आज सकाळी मतदानाला सुरुवात झाली. सकाळी दहा वाजेपर्यंत याठिकाणी मतदान संथगतीने सुरु होते. नाशिकसह जिल्ह्यातील गारठा वाढल्यामुळे सकाळी मतदान संथगतीने सुरु झाले. सकाळी दहा वाजेनंतर मात्र अनेक मतदानकेंद्रांवर मतदारांनी रांगा लावलेल्या दिसून आल्या....

सहा ग्रामपंचायतीमध्ये 292 उमेदवार रिंगणात आहेत. सध्या सुरू आहे. सुरगाणा आणि पेठ नगरपंचायतीमध्ये ओबीसी आरक्षण नाही. त्यामुळे येथे सर्वच्या सर्व 17 जागांवर निवडणूक होत आहे. निफाड आणि दिंडोरी नगरपंचायतीत 14 जागांवर मतदान होणार आहे. देवळा येथे फक्त 11 जागांवर मतदान होणार असून या ठिकाणी 5 जागा ओबीसीसाठी राखीव होत्या.

या निवडणुकीत एकूण 4 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यात देवळा येथील दोन आणि दिंडोरी, कळवण नगरपंचायतीतील प्रत्येकी एक उमेदवाराचा समावेश आहे. दिंडोरीत 17 प्रभागांपैकी 15 प्रभागांत 63 उमेदवारांनी 82 अर्ज दाखल केले होते. याठिकाणी 11 उमेदवारांचे 30 अर्ज माघारी घेण्यात आले. त्यामुळे सध्या 52 उमेदवार रिंगणात आहेत.

कळवमध्ये 14 प्रभागात 48 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. येथे 9 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे 39 जागांवर सामना रंगत आहे. पेठ तालुक्यात 17 प्रभागांसाठी 75 जणांनी उमेदवारी दाखल केली होती. येथे दोन अर्ज बाद ठरले, एकाने माघार घेतली. त्यामुळे 72 जागांवर निवडणूक होत आहे.

निफडामध्ये चौघांनी माघार घेतली आहे. त्यामुळे सध्या 14 जागांसाठी 43 उमेदवारांमध्ये लढत होईल. सुरगाणा येथे दोघांनी माघार घेतली आहे. त्यामुळे 17 प्रभागात 72 जणांमध्ये निवडणूक होणार आहे.

देवळ्यात 11 जागांसाठी 38 अर्ज आले होते. त्यात 5 जणांनी माघार घेतली. त्यामुळे 33 जणांमध्ये लढत बघायला मिळत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com