Video : अहो! मुख्यमंत्रीच नव्हे तर मोठ्या पदावर 'ते' असते; खासदार संजय राऊतांचा टोला

Video : अहो! मुख्यमंत्रीच नव्हे तर मोठ्या पदावर 'ते' असते; खासदार संजय राऊतांचा टोला

नाशिक प्रतिनिधी Nashik

काही दिवसांपूर्वी राज्याचे नागरी आणि अन्नपुरवठा मंत्री तसेच नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal, guardian minister nashik) यांनी 'मी शिवसेनेत (Shivsena) असतो तर मुख्यमंत्री (Chief Minister) झालो असतो असे विधान केले होते. यावर खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) म्हणाले की, शिवसेनेने अनेक लोकांना मोठे केले आहे. मुख्यमंत्रीच नाही कदाचित 'ते' मोठ्या पदावर आज राहिले असते. असा टोला लगावला....

खासदार संजय राऊत नाशिक दौऱ्यावर आहेत. (Sanjay Raut on Nashik tour) आज दुपारी पत्रकार परिषदेला (Press Conference) ते संबोधित करत होते. ते म्हणाले, राज्यातील सरकार हे एकत्रितपणे सूरेख रितीने काम करीत आहेत.त्यांच्या कामावर टिका करणार्‍यांची बगबग व पकपक ही त्यांच्या राजकारणाचा अंंत करणारी ठरणार आहे. विद्यमान सरकार स्थिर असून येणार्‍या 25 वर्षाच्या काळात कोणी यांना सत्तेवरुन हटवू शकणार नाही.

नाशिकमध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ (Inauguration of public works) त्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांचा उल्लेख करताना खा. राऊत म्हणाले की, विरोधात असतानाही सत्ताधार्‍यांना लाजवेल असे काम शिवसेनेच्या नगरसेवकानी उभे केले आहे. येणार्‍या काळात हेच काम पाहुन जनता न्याय करील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी जाहीर कार्यक्रमातून शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) हे माझे गूरू असल्याचे म्हंटले होते. त्यां गूरूंचा अपमान करण्याचे धारिष्ट्य सोमय्या करीत आहेत. शरद पवार हे राष्ट्रीय नेते आहेत.पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) येथील स्मार्ट सिटीच्या (Smart City works corruption) भ्रष्टाचाराचा प्रश्न गंभीर आहे. येथील प्रसाद लाड (Prasad Lad) यांच्या विरोधातील स्मार्टसिटी भ्रष्टाचाराचे सबळ पूरावे सादर करण्यात आलेले आहेत. त्याचा अभ्यास करण्याचा सल्ला किरीट सोमय्यांना दिला.

आशिष शेलारांची (Ashish Shelar) हिंदूत्वाच्या मुद्यावरुन टिका केली. त्यावर बोलताना हिदूत्व हा आमचा आत्मा असल्याचे सांगताना बाबरी मशीद तोडली तेव्हा आम्ही बखाटा वर केल्या नव्हत्या. आज काश्मिर मध्ये हिंदूवर अत्याचार होत आहेत. त्यांचे संरक्षण करण्याचे काम केंद्राचे आहे. हे सांगणे दरिद्राचे आहे काय?

डॉ. स्वामी यांनी बांगलामध्ये हिंदू खतर्‍यात असल्याचे म्हंटले आहे. काश्मिरमध्ये 21 हिंदू शिखांची हत्या झाली. 19 जवान मारले गेले. यांचे संरक्षण करण्याचे केंद्राचे काम नाही काय? अमित शहा कामिरला गेले आहत. त्यांनी तेथेच थांबावे. तेथिल परिस्थीतीवर नियंत्रण आणण्यासाठी तेथे रहावे असेही खा. राऊत यांनी सांगितले. अजित दादांनी पूराव्यानिशी मुद्दे मांडलेले आहेत ते गंभीर आहेत.

राज्य सरकार हे स्थिर आहे. आपला कार्यकाळ पूर्ण करणार आहे. बोगस असलेल्या लोकांनी बोगस प्रकरणे काढलेली आहेत. तयांची बकबक व पकपक ही त्यांच्यासह पक्षाच्या राजकारणाचा अंत करणारी ठरणार असल्याचे स्पष्टीकरण खा संजय राऊत यांनी नाशिक येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com