Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यानाशकात शिवसैनिकांनी भाजपचे कार्यालय फोडले; मोठा पोलीस बंदोबस्त

नाशकात शिवसैनिकांनी भाजपचे कार्यालय फोडले; मोठा पोलीस बंदोबस्त

नाशिक | प्रतिनिधी Nashik

केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वाद चिघळला आहे. संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी आज सकाळी भाजप कार्यालय फोडत नारायण राणे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी भाजपचेही कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमले आहे. यामुळे शिवसेना आणि भाजप कार्यालय परिसरात अनुचित प्रकार टाळण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात केलेले वक्तव्य राणेंना चांगलेच भोवण्याची शक्यता आहे. राणेंना अटक करण्यासाठी नाशिक पोलिसांचे एक पथक रवाना झाले असल्याचे समजते.

राणेंच्या विरोधात नाशिकमध्ये शिवसैनिक आक्रमक झाले असून आता राणे विरुद्ध शिवसेना वाद चांगलाच तापल्याचे दिसत आहे. नारायण राणेंच्या वक्तव्यानंतर शिवसैनिक नाशिकमध्ये आक्रमक नाशिकमधील भाजपच्या कार्यालयावर दगडफेक केली. यानंतर याठिकाणी मोठा पोलीसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

दुसरीकडे शिवसेनेच्या शालीमार येथील मुख्य कार्यालयातदेखील मोठ्या संख्येने पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याठिकाणी शिवसैनिकांची मोठी गर्दी बघायला मिळते आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या