पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांची बदली; शहाजी उमाप नवे अधीक्षक

पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांची बदली; शहाजी उमाप नवे अधीक्षक

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिकचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी शहाजी उमाप नवे पोलीस अधीक्षक म्हणून लवकरच पदभार स्वीकारणार आहेत....

सचिन पाटील (Sachin Patil) यांची राज्याच्या गुप्तवार्ता विभागात (SID) उपायुक्त पदी मुंबईत नियुक्ती करण्यात आली आहे. तर व्हीआयपी सुरक्षा मुंबई (VIP Security Mumbai) शहराच्या पोलीस उपआयुक्तपदी नियुक्त असलेल्या शहाजी उमाप (Shahaji Umap) यांची नाशिकला बदली झाली आहे. आज सायंकाळी याबाबतची ऑर्डर प्राप्त झाली आहे. तब्बल राज्यातील ३१ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र राज्याचे सहसचिव कैलास गायकवाड यांनी बाबतचे आदेश धाडले असून लवकरच निवनियुक्त अधिकारी पदभार स्वीकारणार आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com