रामकुंडाजवळ सात फुटावर बोअरला लागले पाणी

रामकुंडाजवळ सात फुटावर बोअरला लागले पाणी

नाशिक । प्रतिनिधी

गोदावरी नदीपात्रातील काॅक्रिटीकरण काढण्याचे काम सुरु असून तेथील प्राचीन कुंडाचे नैसर्गिक जलस्त्रोत जिवंत आहे कि नाही हे पाहण्यासाठी रामकुंडाजवळ पाडण्यात आलेल्या बोअरला सात फुटाला पाणी लागले आहे. त्यामुळे नदीपात्रातील जलस्त्रोत जिवंत असल्याच्या गोदाप्रवमीच्या दाव्यावर शिक्कामोर्तब झाले आहे...

तीन कुंडांचे काॅक्रिटिकरण काढले जात असून प्राचीन कुंड पुन्हा जिवंत केली जात आहे. पण नदीपात्र काॅक्रिटमुक्त केल्यावर तेथील प्राचीन कुंडाचे नैसर्गिक स्त्रोत जिवंत आहे की नाही याबाबत स्मार्ट सिटिकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते.

त्यामुळे या ठिकाणी रामकुंडाजवळ बोअर पाडून पाणी लागते की नाही याचि पाहणी केली जाणार होती. सोमवारी (दि.१४) रात्री बोअरवरल पाडण्यात आली. या ठिकाणी अवघ्या सात फुटावर पाणि लागले.

त्यामुळे गोदापात्र काॅक्रिटिकरण मोहिमेने वेग मिळणार आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत दक्षिण गंगा अशी ओळख असलेल्या गोदावरी नदीपात्राचे तळ क्राॅक्रिटिकरण काढण्याच्या कामाने वेग घेतला आहे.

रामकुंड येथील हनुमान ते गाडगे महाराज पूल या पट्यातील अतिप्राचीन रामगया, पेशवे व खंडोबा कुंडतील क्राॅक्रिटीकरण काढण्याचे काम मागील एक आठवडयापासुन जोरात काम सुरु आहे.

गोदाप्रेमींच्या लढयाला यश येत असल्याचे पहायला मिळत आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत पावसाळा सुरु होण्यापुर्वी गोदानदीपात्रातील काॅक्रिटिकरण काढण्याचे काम महापालिकेकडून हाती घेण्यात आले होते. जून ते आॅगस्टची सुरवात या कालावधीत नदीपात्रातील अनामिक व दश्वामेध या दोन कुंडाचे काॅक्रिटिकरण काढण्यात आले.

त्यानंतर पावसामुळे नदी पात्राची पाणी पातळी वाढल्याने काम थांबविण्यात आले होते. तसेच धरणातुनही विसर्ग सुरु होता. त्यामुळे काम होऊ शकले नव्हते. आता पावसळा संपला असून धरणातुनही विसर्ग थांबविण्यात आला आहे.

त्यामुळे गोदापात्र काॅक्रिटीकरण काढण्याचे काम पुन्हा एकदा सुरु झाले असून मागील दोन दिवसात जेसीबीद्वारे काॅक्रिटिकरण काढले जात आहे. एकूण पाच कुंड काॅक्रिटिकरण मुक्त करायचे आहे. त्यापैकी अनामिक व दश्वामेध हि कुंड पावसाळ्यापुर्वी काॅक्रिटिकरण मुक्त करण्यात आली.

प्रतिक्रिया

गोदा पात्र काॅक्रिटिकरण मुक्त करुन प्राचीन कुंड पुनर्जिवित केले जात आहे. पण कुंडांचे नैसर्गिक स्त्रोत जिवंत आहे की नाही हे पाहण्यासाठी स्मार्ट सिटी अधिकार्‍यांनी बोअर टाकुन पडताळणी केली. यावेळी ७ फुट बोअर खोदल्यावर पाणी लागले. त्यामुळे प्राचीन कुंडाचे जलस्त्रोत जिवंत असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

- देवांग जानी, गोदाप्रेमी

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com