...तर नाशिकमधील अभयारण्यात पून्हा प्रवेशबंदी

...तर नाशिकमधील अभयारण्यात पून्हा प्रवेशबंदी

नाशिक | प्रतिनिधी

कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात आल्यानंतर नाशिक वनवृत्तातील अभयारण्यातील प्रवेशबंदी हटविण्याचा निर्णय वन्यजीव विभागाने काहीं दिवसापूर्वी घेतला होता. बंदी हटविल्यानंतर अभयारण्यामध्ये पर्यटकांची गर्दी वाढू लागल्याचे चित्र आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान शासनाकडून आदेश आल्यास पून्हा नाशिक वनवृत्त्तातील अभयारण्यात पर्यटकांना प्रवेशबंदी केली जाईल, मात्र तो पर्यन्त अभयारण्यात येणार्‍या प्रत्येकाची थर्मल स्क्रीनिंग करून आणि अत्यावश्यक खबरदारी घेऊनच प्रवेश दिला जात असल्याचे, नाशिक वन्यजीव विभागाचे वनसंरक्षक अनिल अंजनकर यांनी सांगितले आहे...

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेल्या दीड वर्षापासून अभयारण्यासह राखीव वनक्षेत्रात प्रवेश करण्यास सक्त मनाईचे आदेश देण्यात आले होते. नाशिक वनवृत्तातील नांदूरमध्यमेश्वर (नाशिक), कळसूबाई, हरिश्चंद्रगड (अहमदनगर), अनेर डॅम (धुळे), यावल (जळगाव) हे अभयारण्य बंदच होते. मात्र, मागील काही दिवसांपासून नाशिक वनवृत्तात कोरोना रुग्णांची संख्याकमी झाल्याने शासनाने वनपर्यटनाला हिरवा कंदील दिला होता.

शासनाने घालून दिलेले निर्बध वन्यजिव विभागाकडून पय र्ट्कांना सांगितले जात आहे. राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याने भंडारदरा परिसरात कोरोना नियमांचे पालन करत पर्यटकांना प्रवेश देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे जुलैपर्यंत पर्यटकांना लखलखणा-या काजव्यांचा निसर्गाविष्कार पाहण्याची संधी मिळणार आहे.

मान्सून पर्यटनाच्या माध्यमातून वन्यजीव विभागाला उत्पन्न मिळणार आहे. तसेच निवास आणि गाइडच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगारही मिळणार आहे. त्यामुळे अभयारण्ये खुली करण्याच्या निर्णयाचे निसर्गप्रेमी, पर्यटक आणि स्थानिक नागरिकांनी स्वागत केले आहे. अभयारण्यामधील प्रवेशबंदी उठविल्यानंतर कोरोनाचा प्रचार प्रसार होणार नाही, याकरिता खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

त्यानुसार अभयारण्यात येणार्‍या प्रत्येक पर्यटकाला थर्मल स्क्रिनिंगनंतरच प्रवेश दिला जातो आहे. एका स्पॉटवर व्यक्तिंना ठरून प्रवेश दिला जात आहे. पर्यटकांनी अभारण्यात सोशल डिस्टन्सिंग पालन करावे, तसेच मास्क व सॅनिटायझर सोबत ठेवण्याच्या सुचना केल्या जात असल्याचा दावा वन्य जीव विभागाने केला आहे. दरम्यान पर्यटकांना प्रवेश दिल्यानंतर कुठेही हुल्लडबाजी झाली नसल्याचा दावा या विभागाने केला आहे.

पयर्ट्नासाठी येणार्‍या प्रत्येक पयर्ट्कावर वन्यजिव विभागाची नजर आहे. कोठेही सोशल डिस्ट्ंन्सींगचा चे नियम मोड्ले जाणार नाही. अभयारण्यात कोणी हुल्लड्बाजी करतेय का याकडे विशेष लक्ष आहे, जो कोणी नियमांचे पालन करणार नाही, त्यांच्यावर तत्काळ वन्यजिव विभागाकडून कारवाई केली जाईल येइल. आमचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे बारीक लक्ष आहे.

अनिल अंजनकर, वनसंरक्षक, नाशिक वन्यजीव विभाग (नाशिक)

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com