पुष्पक एक्स्प्रेसमध्ये दरोडा; एका महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न

पुष्पक एक्स्प्रेसमध्ये दरोडा; एका महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न

इगतपुरी । प्रतिनिधी Igatpuri

इगतपुरी ते कसारा (Igatpuri to kasara) दरम्यान धावत्या एक्सप्रेसमध्ये लुट आणि बलात्काराच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. लखनऊ ते मुंबई या धावत्या पुष्पक एक्सप्रेसमध्ये (Pushpak Express) सात ते आठ दरोडेखोरांनी १६ प्रवाशांना लुटण्यासह एका महिलेवर बलात्कार (Rape on woman passenger) केल्याची धक्कादायक घटना काल रात्री ८ च्या सुमारास इगतपुरी ते कसारा दरम्यान घडली...

पुष्पक एक्स्प्रेसमध्ये दरोडा; एका महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न
चिपी विमानतळाच्या उद्घाटनाप्रसंगी उद्धव ठाकरेंची तुफान फटकेबाजी, म्हणाले...

दरोड्या नंतर यातील काही आरोपी कसारा रेल्वे स्थानकावर (Kasara Railway Station) उतरून पसार झाले. मात्र याच दरम्यान यातील दोन आरोपींना प्रवाशांनी मोठ्या धाडसाने पकडले. या प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात रॉबरीचा (Robbery) गुन्हा दाखल करत चार जणांना अटक केली असून उर्वरित फरार आरोपींचा शोध सुरू आहे. या आठ आरोपीमधील सात जन इगतपुरी घोटी (Igatpuri Ghoti area) परिसरात राहतात तर एक आरोपी मुंबई (Mumbai) येथे राहणारा आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा रेल्वे प्रवाशांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे.

पुष्पक एक्स्प्रेसमध्ये दरोडा; एका महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न
आयकर छाप्यांचा भाजपशी संबंध जोडणे हास्यास्पद

शुक्रवार दि. ८ रोजी संध्याकाळी सहाच्या सुमारास लखनऊ मुंबई पुष्पक एक्सप्रेस (Pushpak express) इगतपुरी स्टेशनला पोहोचली. इगतपुरी स्थानकातून एक्स्प्रेस मुंबईच्या दिशेने निघाली असतांना आठ जन या एक्स्प्रेसमध्ये चढले. एक्स्प्रेसने इगतपुरी स्थानक सोडताच या आठ जणांनी प्रवाशांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

महिलांची छेड काढण्यास सुरुवात करीत अनेक महिलांचा विनयभंग केला. हे सर्व दरोडेखोर प्रवाशांकडून मोबाईल आणि पैसे हिसकावून घेत होते. प्रतिकार करणाऱ्या प्रवाशांना त्यांनी बेदम मारहाण करायला सुरुवात केली.

गाडीतील १६ प्रवाशांना या दरोडेखोरांनी लुटत त्यांच्याकडुन मोबाईल व रोकड हिसकावून घेतली. यावर दरोडेखोर इथेच थांबले नाही तर त्यांनी पती सोबत प्रवास करणाऱ्या २० वर्षीय महिलेची छेड काढत तिच्यावर बलात्कार केला.

कसारा घाटात दरोडेखोरांचा हा थरार सुरू होता. कसारा रेल्वे स्थानक येताच या दरोडेखोरांनी उतरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. या मधील सहा आरोपी निसटले मात्र याच दरम्यान काही धाडसी प्रवाशांनी दोन दरोडेखोरांना पकडून ठेवले. ट्रेन कसारा स्थानकात येताच पोलिसांनी या दरोडेखोरांना आपल्या ताब्यात घेतले.

या प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चार आरोपीना अटक करण्यात आली आहे. प्रकाश पारधी (Prakash Paradhi) व अर्षद शेख(Arshad Shaikh) या दोन आरोपींची नाव समजली आहे. हे आठ आरोपी एकमेकांचे मित्र असून यामधील सात जण घोटी मध्ये राहतात तर एक जण मुंबई येथे राहण्यास आहे. नशेच्या अमलाखाली त्यांनी हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. कल्याण लोहमार्ग पोलीसांची पथके फरार आरोपींचा शोध घेत आहेत. विविध पथक कल्याण जीआरपी आणि कल्याण रेल्वे क्राईम ब्रांच या प्रकरणाचा तपास करीत आहे .

पुष्पक एक्स्प्रेसमध्ये दरोडा; एका महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न
क्रुझवरील रेव्ह पार्टीत भाजप नेत्याचा मेहुणा

घटना घडल्यानंतर आम्ही घटनास्थळ न पाहता कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. महिलेची तब्येत स्थीर असुन आठ पैकी सात आरोपी घोटीचे राहणार आहे, तर एक आरोपी मुंबईचा आहे. इतर आरोपींचा शोध सुरू आहे. --

मनोज पाटील, मध्य रेल्वे

लांब पल्ल्याच्या प्रत्येक धावत्या ट्रेनमध्ये रेल्वे सुरक्षा बलाचे ( RPF ) कर्मचारी डब्ब्यात गस्त घालण्यासाठी कार्यरत असतात. परंतु कार्यरत रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी एकाच जागेवर बसून असतात. हा प्रकार झाला तेव्हा एकही कर्मचारी, टी सी अथवा रेल्वे सुरक्षा बलाचे जवान प्रवाशांच्या मदतीला धावुन आले नाही.

शाम धुमाळ, आपत्ती व्यवस्थापन ग्रुप, कसारा

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com