Video : नाशिकमधील निर्बंध जैसे थे!

पालकमंत्र्यांनी घेतला आढावा; सीएसआर निधीबाबत झाली चर्चा
Video : नाशिकमधील निर्बंध जैसे थे!
छगन भुजबळ

नाशिक | प्रतिनिधी Nashik

कोरोनाच्या संकटावर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी जिल्ह्यातील सर्वसर्व प्रकारचे निर्बंध जैसे थे ठेवत जिल्ह्यातील सर्वच कंपन्यांनी आपला सामाजिक दायीत्व निधी (सीएसआर फंड) (CSR Fund) ऑक्सिजन प्लांट (Oxygen Plant) व इतर वैद्यकीय सोयी सुवीधांसाठी खर्च करावा. असे आवाहन आज पालकमंत्री छगन भुजबळ (Guardian minister Chhagan Bhujbal) यांनी केले....

दर आठवड्यााला होणारी कोरोना आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. (Covid 19 review Meeting)

ते पुढे म्हणाले की, सध्याची परिस्थिती पाहता राज्यशासनाने सुध्दा आपले सात ट्क्के बजेट कमी केले आहे. त्यामुळे सीएसएआर फंडातुन इतर कामे करण्यापेक्षा गरजेच्या वैद्यकीय सुविधा केल्यास त्याचा निश्चित फायदा हाईेल.

तिसर्‍या लाटेवर मात करण्यसाठी ऑक्सिजन प्लांट (Oxygen Plant) उभारण्यासठी औद्यागिक वसाहतीत जागेसह इतर सुविधा देऊ केल्या आहेत.

ऑगस्टपर्यंत प्लांट कार्यान्वित केले जातील अशी अपेक्षा आहे. सध्या करोना रुग्णाचा आकडा कमी झाला असली तरी ग्रामीण भागात रुग्ण परत वाढत आहेत. त्याला मुख्यत: लग्न सोहळे कारणीभूत दिसत आहेत.

त्यामुळे गर्दी होणार नाही याची दक्षता घेणे तसेच मास्क वापरणे, हात वारंवार स्वच्छ करणे व ताप मोजल्या शिवाय कोणाला जाऊ न देणे ही दक्षता घ्यावी लागणार आहे. प्रत्येकावर लक्ष ठेवणे शक्य नाही तरीदेखील प्रत्येकाने वैयक्तिक काळजी घेणे गरजेचे आहे असे ते यावेळी म्हणाले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com