Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याआतापर्यत 'इतक्या' अनाथ मुलांची शाळेची फी भरली, पुस्तकं दिली, वारस नोंद अन्...

आतापर्यत ‘इतक्या’ अनाथ मुलांची शाळेची फी भरली, पुस्तकं दिली, वारस नोंद अन् आर्थिक साहाय्य केले

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

करोनामुळे (Corona) दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची जबाबदारी महसूल अधिकाऱ्यांनी (Revenue Officers) स्वीकारली आहे. नाशिक जिल्ह्यात राबविण्यात आलेला या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे….

- Advertisement -

या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील महसूल खात्यातील अधिकाऱ्यांनी करोनामध्ये दोन्ही पालक गमावलेल्या पाल्यांचे पालकत्व स्वीकारण्यास सुरुवात केली असून जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी आज याबाबतची माहिती देत. बागलाण तसेच चांदवाड तालुक्यातील मुलांचे पालकत्व स्वीकारण्यास सुरुवात केली आहे.

करोनानंतर पालक अथवा जोडीदार गमावलेल्या व्यक्तींसाठी ‘मिशन वात्सल्य’ (Mission Vatsalya) ही योजना सुरू झाली आहे. आपल्या जिल्ह्यात आपण एका कार्डवर सर्व लाभ देण्याचा उपक्रम सुरू केल्याचे जिल्हाधिकारी मांढरे म्हणाले. ते सांगतात या मोहिमेचा चांगला परिणाम दिसून आला आहे…

…अन् त्यांना मिळाला ममतेचा निवारा

पहिली घटना

दरम्यान, आज या मोहिमेला बागलाण तालुक्यात (Baglan Taluka) प्रतिसाद देण्यात आला असून या अहवालानुसार, काल (दि २१) रोजी बागलाण तालुक्यातील नामपूर (Nampur) या गावात कोविड-19 मुळे अनाथ झालेल्या बालकाला भेट दिली.

भेटीदरम्यान कुटुंबाची पार्श्वभूमी जाणून घेतली. तेव्हा असे समजले की, ते एकूण चार भावंडं आहेत. दोन बहिणी व दोन भाऊ. त्यापैकी मोठ्या बहिणीचे लग्न झालेले असून इतर तिघे सध्या तिच्यासोबत नामपूर (ता. बागलाण) येथे भाड्याच्या खोलीत राहत आहेत.

त्यापैकी इतर तिघा भावंडांचे वय 22,20,16 वर्षे असे आहे. यावेळी सर्वांशी चर्चा करण्यात आली तेव्हा त्यांना महसूल विभागाच्या व महिला बालविकास विभागाच्या योजनांची माहिती देण्यात आली.

16 वर्षे वय असलेल्या बालकाला (प्रतिक) महसूल विभागाच्या योजनेंतर्गत संजय गांधी निराधार योजना, अनाथ बालकाला शिधापत्रिकेचा लाभ या योजना जागेवरच मंजुर करण्यात आल्या.

तर महिला बालविकास विभागामार्फत देण्यात येणाऱ्या बालसंगोपन योजनेची माहिती देऊन कागदपत्राची अपूर्तता पूर्ण करण्यास मदत करून अनाथ बालकासाठी असणाऱ्या राज्य शासन 5 लाखांची आर्थिक मदत पंतप्रधान आधार योजनेंर्गत 10 लाखांचे अर्थ सहाय्य इत्यादीचा लाभ या 18 वर्षाच्या आतील बालकास लवकरात लवकर मिळेल असे प्रयत्न करण्यात आले आहेत.

तसेच या बालकास महिला व बालविकास विभागामार्फत अनाथ प्रमाणपत्र देण्यात आले आहे, याचा या बालकाला भविष्यात नक्कीच फायदा होऊ शकतो.

प्रतीक सध्या दहावीला असून येत्या एक ते दीड महिन्यात त्याची परीक्षा आहे. त्यासाठी त्याला नामपूर येथे एका स्टडी हॉलला सुद्धा ऍडमिशन घेऊन देण्यात आलेले आहे.

22 वर्षीय बहिणीची (कोमल) देखील दखल घेण्यात आली असून तिचे शिक्षण संगणक शास्त्रातून वोकेशनल ट्रेनिंग झालेले असून तिला संगणक शाखेतून डिप्लोमा करायचा आहे.

तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करायची आहे. त्यासाठी तिला मदत तालुका महसूल कर्मचारी संघटनेमार्फत स्पर्धा परीक्षा विशेष आवश्यक असणारी पुस्तके भेट म्हणून दिली.

तसेच तिच्या मनमाड येथील कॉलेजची तृतीय व चतुर्थ वर्षाची फी भरण्यासाठी तालुका महसूल संघटनेमार्फत तरतूद करण्यात आली.

20 वर्षाचा एक भाऊ आहे. त्याचे शिक्षण 12 वी (कला शाखेतून) झाले आहे. त्याच्यासाठी देखील ITI संदर्भात ITI सटाणा येथील प्राचार्यांशी बोलणे झाले आहे.

शालेय वर्ष जरी दोन पासून सुरू होणार असले तरी सध्या दोन-तीन महिन्यात काही जुजबी कौशल्य विषयक शिक्षण देण्याविषयी विनंती केलेली आहे. त्यास सटाणा येथील आयटीआय प्रिन्सिपल यांनी सकारात्मक प्रतिसाद देखील दिलेला आहे. येत्या आठवड्यात त्याच्या प्रशिक्षणास सुरुवात होईल.

लग्न झालेल्या बहिणीला देखील भविष्यात नामपूर या ठिकाणी महिला व बालविकास विभागामार्फत ब्युटी पार्लर, शिवणकाम , इमिटेशन ज्वेलरी, दुग्धजन्य पदार्थांचे प्रशिक्षण इ. प्रकारचे प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी केलेली आहे. यामुळे त्यांना भविष्यात उदरनिर्वाहाचे एक साधन उपलब्ध होऊ शकते.

कुटुंब मूळचे चांदवड तालुक्यातील दहेगाव येथील आहे. तीनही भावंडांचे जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी आजच सेतुमार्फत फॉर्म भरला असून या आठवड्यात तीनही भावंडांना जातीचे प्रमाणपत्र व नॉन क्रेमेलयेर प्रमाणपत्र मिळेल अशी व्यवस्था केलेली आहे.

——————————————————————————————————-

दुसरी घटना

कोविड मध्ये अनाथ झालेल्या बालकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देऊन आधार देण्यासाठी शासकीय मदत दूत म्हणून काल (दि 21) रोजी मौजे बहादुरी तालुका चांदवड येथील ज्ञानेश्वर लक्ष्मण पाटील या अनाथ बालकाच्या घरी जाऊन भेट घेतली व त्याच्या समस्या जाणून घेतल्या.

5 लाख मुदत ठेव बाबत प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. तसेच 10 लाख पीएम केअर पोर्टलला जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव सादर करण्यात आले आहे.

तसेच शेतीवर वारस नोंद घेण्यात आली आहे. वडिलांच्या जागेवर ग्राम पंचायत येथे कर्मचारी म्हणून कामावर घेतले आहे व कायम करण्याबाबत ग्रामसेवक व बीडीओ यांना सूचना दिल्या आहेत.

कर्तव्यावर असताना कोविड मध्ये मृत्यू झाल्यामुळे 50 लाख रुपये आर्थिक साहाय्य प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. रमाई घरकुल लाभ प्राप्त झाला असून ग्रामसेवक यांना वारस नोंद करण्यास सूचना दिली आहे. तसेच इतर शासकीय योजनांचा लाभ देण्याची तजवीज ठेवली आहे.

————————————————————————————————

तिसरी घटना

मिताशा साहेबराव पवार (रा नवी बेज ता कळवण) या अनाथ बालकाच्या घरी आज भेट दिली. बालविकास प्रकल्प अधिकारी, तलाठी मंडळ अधिकारी व पोलीस पाटील होते. मिताशाला 5 लाखाचे मुदत ठेव प्रमाणपत्र मिळाले आहे; तसेच बालसंगोपन योजना अंतर्गत लाभ मिळाला आहे. इतर योजना चा लाभ देणे बाबत तजवीज ठेवली आहे.कळवण येथील शरद पवार स्कुल 12 वी पर्यंत मोफत शिक्षण देण्यास तयार आहे. त्याबाबत पालकांशी चर्चा केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या