धक्कादायक! रेल्वे पोलिसांनी पकडलेल्या तरुणाकडे १७ सिमकार्ड, बनावट पासपोर्ट आणि बरंच काही

धक्कादायक! रेल्वे पोलिसांनी पकडलेल्या तरुणाकडे १७ सिमकार्ड, बनावट पासपोर्ट आणि बरंच काही

मनमाड | प्रतिनिधी Manmad Nashik

रेल्वे पोलिसांनी (Railway Police) पकडलेल्या तरुणाकडे 17 सिमकार्ड (Simcard),6 आधारकार्ड (Adharcard) ,एक टॅब (Tab) ,एक मोबाईल (Mobile) आणि दुसऱ्या व्यक्तीच्या नावाचा पासपोर्ट (Passport) आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली असून महेशकुमार पाठक असे या तरुणाचे नाव आहे...

तो दिल्लीचा (Delhi) रहिवासी आहे. याप्रकरणी पोलिसांनी या तरूणा विरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर त्याला कोर्टात हजर केले असता कोर्टाने 4 दिवसाची पोलीस कोठडीत दिली असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, महेशकुमार पाठक हा दिल्ली येथून मनमाडला आल्यानंतर काकीनाडा एक्स्प्रेसने (Kakinada express) तो शिर्डीला (Shirdi) जात होता गाडीत तिकीट तपासणी करण्यासाठी आलेल्या टीसीने त्याच्याकडे तिकीटाची मागणी केली मात्र त्याचे कडे तिकीट नसल्यामुळे टीसीने त्याला रेल्वे पोलिसांच्या हवाली केले पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याच्याकडे 17 सीमकार्डे,6 आधारकार्डे,मोबाईल,

एक टॅब आणि इमरोज खान या व्यक्तीच्या नावाचा पासपोर्ट आढळून आला.सदर वस्तू त्याच्या बैगेतून मिळाल्यानंतर पोलिसांची देखील तारांबळ उडाली आणि त्यांनी त्याची कसून चौकशी केली सध्या वेगवेगळ्या भागातून काही संशयित अतिरेकी पकडले जात असल्यामुळे या घटनेची माहिती मिळताच एटीएस सह इतर तपास यंत्रणा तातडीने मनमाडला दाखल झाले व त्यांनी देखील या तरुणाची कसून चौकशी केली आहे मात्र त्यांना मोठे काही आक्षेपार्ह आढळून आले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

घटनेचा कसून तपास केल्यानंतर हा तरुण अनाथ असून ज्या व्यक्तीने याचे पालन पोषण केले त्याचा देखील मृत्यू झाला त्यामुळे हा तरुण पुन्हा रस्त्यावर आला आहे त्याची आर्थिक परिस्थिती हलाकीची असल्यामुळे तो मोबाईल चे रिचार्ज करू शकत नव्हता त्यामुळे त्याने बनावट आधारकार्डच्या साह्याने सीमकार्ड खरेदी करून त्या माध्यमातून ऑनलाइन गेम खेळत असल्याचे समोर आले.या तरुणाच्या विरुद्ध भादंवि ४२०, ४६५, ४७१, १३७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे

श्री.जोगदंड,रेल्वे पोलीस निरीक्षक,मनमाड

Related Stories

No stories found.