Friday, April 26, 2024
Homeनाशिकउद्योगाऐवजी आरोग्याला ऑक्सिजन देण्यास प्राधान्य देणार

उद्योगाऐवजी आरोग्याला ऑक्सिजन देण्यास प्राधान्य देणार

नाशिक । प्रतिनिधी

ऑक्सिजनच्या पुरवठा टंचाई दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तत्काळ पावले उचलले असून जिल्हयात निर्मित व उपलब्ध होणारा सर्वच लिक्वीड ऑक्सीजन हा केवळ रुग्ण आणि आरोग्यासाठीच वापरला जाणार आहे.

- Advertisement -

टंचाई भासू नये म्हणून प्रसंगी उद्योगांचाही ऑक्सीजन पुरवठा बंद केला जाईल. उद्योगांनाही त्यांची उपयोगिता पाहूनच देण्याचा विचार केला जाईल. असा निर्णय जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी घेतला आहे.

मांढरे यांनी बुधवारी (दि.९) जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व ऑक्सीजन उत्पादक, वितरक, पुरवठादारांसह संबधित शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यामध्ये ऑक्सीजन उपलब्धी, कोरोना चाचण्या, विविध रुग्णांलयांतील खाटा, व्हेंटीलेटर, औषधांची उपलब्धता, रुग्ण वाहिका, प्लाझ्मा थेरपी अशा सर्वच बाबींचा आढावा घेण्यात आला.

त्यात प्रामुख्याने वाढती गंभीर रुग्ण संख्या, मृतांची संख्या पाहाता ऑक्सीजनची टंचाई जानवत आहे. मालेगावमध्ये तर आजच ऑक्सीजनचा प्रचंड तुटवडा आहे. त्यामुळे ऑक्सीजनच्या स्थितीवर विशेष भर देण्यात आला.

याबाबत माहिती देताना जिल्हाधिकारी मांढरे म्हणाले, सध्याच्या स्थितीत जिल्ह्यात ४३ मेट्रीक टन ऑक्सीजनची उपलब्धता आहे. म्हणजे गरजेपुरता ऑक्सीजन आहे. परंतू पुढील पंधरवाड्याचा विचार केला तर १० ते १२ टक्के ऑक्सीजनची टंचाई निर्माण होईल.

त्यामुळे हा अधिकचा आवश्यक असलेला ऑक्सीजनची व्यवस्था आजपासूनच करण्याची आवश्यकता असून त्यानुसार प्रशासकीय स्तरावर नियोजन देखील सुरु आहे. तीन पुरवठादारांनाही बैठकीला बोलवित त्यांच्याकडून अपेक्षित ऑक्सीजन उपलब्धतेसाठी टाय-अप करण्यात आले असून, ऑक्सीजन उपलब्धतेबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी अश्वासित केले.

१० ते १२ टक्के वाढीव ऑक्सीजन लागणार

जिल्हयात ११४० रुग्ण हे गंभीर असल्याने ऑक्सीजन किंवा व्हेंटीलेटरवर आहेत. त्यानुसार सध्याच्या स्थितीत ४३ मेट्रीक टन इतका ऑक्सीजन पुरवठा पुरेसा आहे. पण ही संख्या ऑक्टोबरमध्ये २४०० रुग्णांवर वाढण्याचा अंदाज आहे. त्यानुसार १० ते १२ टक्के वाढीव ऑक्सीजनची गरज जिल्ह्यास भासणार आहे.

त्यासाठी आजच नियोजन करणे अत्यावश्यक असून यंत्रणेची तशी तयारी सुरु आहे. विशेष म्हणजे मार्च महिन्यात १०० ऑक्सीजन सिलिंडरची गरज असताना आपल्याकडे त्यापेक्षा कित्येक पट अधिक ऑक्सीजन उपलब्ध असल्याने तेव्हा गरज नव्हती. शिवाय गरज पडू शकेल असा अंदाजही कुणी व्यक्त केला नव्हता. परंतू आज त्यापेक्षा अधिक ऑक्सीजनची गरज निर्माण झाली आहे.

या कंपन्या पुरवणार ऑक्सिजन

१) प्राक्सा एअर

२) आयनॉक्स

३) जे.एस.डब्ल्यू

- Advertisment -

ताज्या बातम्या