बापरे! पीपीई कीट बनविणाऱ्या कंपनीतील ४४ कामगार 'पाॅझिटिव्ह'
मुख्य बातम्या

बापरे! पीपीई कीट बनविणाऱ्या कंपनीतील ४४ कामगार 'पाॅझिटिव्ह'

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

दिंडोरी | प्रतिनिधी Dindori

दिंडोरी-पालखेड (Dindori-Palkhed) औदयोगिक वसाहतीतील (MIDC) येथील एका कंपनीतील 44 अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कंपनी बंद करण्यात आली आहे. पालखेड ग्रामपंचायतीसह जिल्हा प्रशासनाने कंपनीला खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत.

दिंडोरी तालुक्यात औषधे बनवणाऱ्या अनेक कंपन्या असून यातीलच ही एक कंपनी आहे. सदर कंपनी करोना पीपीई किट बाबतही काम करते.

पहिल्या कडक लॉकडाऊनमध्ये कंपनीने अत्यावश्यक सेवा असल्यामुळे काम सुरु ठेवले होते. या कंपनीत आता 44 अधिकारी व कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त प्रशासनाला देण्यात आले आहे.

रुग्ण आढळून आल्यानंतर आता ही कंपनी बंद करण्याचे पत्र पालखेड ग्रामपंचायतीने दिले आहेत.

कंपनीने हलगर्जी पणा केल्यामुळे करोनाचा फैलाव झाल्याचा आरोप पालखेड ग्रामस्थांनी केला आहे. तर सामान्य नागरिकांकडून गुन्हा घडल्यास आपत्ती निवारण कायद्यानुसार गुन्हे दाखल करणारे शासन दिंडोरी तालुक्यात करोनाच्या पार्श्वभूमीवर किती कंपनी व्यवस्थापनावर कारवाई करते याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागून आहे.

Deshdoot
www.deshdoot.com