यंदा गणेशोत्सवात पोलिसांवरचा ताण हलका

यंदा गणेशोत्सवात पोलिसांवरचा ताण हलका

नाशिक | प्रतिनिधी Nashik

कराेनामुळे सार्वजनिक गणेशाेत्सवाला (Ganesh Festival) परवानगी असली तरी, सर्वसामान्यांसाठी गणपती दर्शन, देखावे पाहण्यासाठी बंदी आहे. त्यामुळे दरवर्षीच्या कडेकोट बंदोबस्ताऐवजी पाेलिसांचा किरकाेळ स्वरुपात बंदोबस्त लावण्यात आला आहे...

दरवर्षी एसआरपीएफच्या (SRPF) प्लाटून, प्रशासकीय विभागातील पाेलिस आधिकाऱ्यांना बंदाेबस्तासाठी नेमले जायचे. यंदा मात्र हे प्रमाण घटले असून अनेक पाेलिसांची फरफट यामुळे थांबली आहे.

कराेना संकट आल्यापासून आराेग्य व पाेलिस यंत्रणेची मानपाठ एक झाली हाेती. कायदा, सुव्यवस्था आणि आराेग्य सेवा देणाऱ्या या दाेन्ही यंत्रणांवर कामाचे सर्वात जास्त दबाव हाेते. दीड वर्ष धुमाकूळ घातलेल्या कराेनाचा अटकाव करण्यात काहीअंशी यश आले. मागील वर्षी कराेनाचा प्रकाेप असल्याने हजाराे पाेलिस रस्त्यावर हाेते.

मात्र, कराेना चा प्रकोप कमी होत असताना अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे पाेलिसांवरचा अतिरिक्त ताण कमी झाला. तसेच दरवर्षी येणारा गणेशाेत्सव, रमजान (Ramzan), बकरी इद (Bakari eid) आणि अन्य महत्त्वाचे सण, उत्सव परंपरेनुसार साजरे करण्यात बंधने आली. त्यामुळे नेहमीच असणारा बंदाेबस्त, नाकाबंदी, मिरवणूक बंदाेबस्त यावर काहीअंशी बंधने आली.

पाेलिसांवर बंदाेबस्ताचा ताण पडला नाही. यंदाही सार्वजनिक गणेशमंडळांना कराेना प्रतिबंधात्मक नियमावली देण्यात आली आहे.

त्यानुसार गणेशभक्तांना मंडपात येऊन दर्शन घेण्यास, मिरवणूक काढण्यास, पाच व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी आहे. त्यामुळे गर्दी हाेेणारच नसल्याने पाेलिसांवर येणारा बंदाेबस्ताचा अतिरिक्त ताण यंदा हलका आणि दिलासा देणारा ठरताे आहे. क्वचितप्रसंगी किंवा अतिसंवेदनशील मंडळांजवळच बंदाेबस्त पुरविण्यात आला आहे.

या पाेलिसांसह हाेमगार्डसचा बंदाेबस्त (Home guard Deployment) पुरविण्यात आला आहे. दरवर्षी परजिल्ह्यातून मागविल्या जाणाऱ्या एसआरपीएफच्या (SRPF) प्लाटूनदेखिल कमी प्रमाणात पाठविण्यात आल्या आहेत. एकंदरित गणपती बंदाेबस्त कमी असला तरी, पाेलिस आयुक्त दीपक पांडेय (Police Commissioner Deepak Pandey) हेल्मेटसक्तीसाठी वाहतुक पाेलिस आणि पाेलिस ठाण्यांतील कर्मचाऱ्यांकडून फ्लाईंग स्काॅडच्या नावाने कसर काढून घेत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com