Saturday, April 27, 2024
Homeनाशिकनाशिक शहरात पोलिसांची रात्रभर गस्त; शॉर्टकट मार्गांवर तपासणी

नाशिक शहरात पोलिसांची रात्रभर गस्त; शॉर्टकट मार्गांवर तपासणी

नाशिक l प्रतिनिधी

सरत्या वर्षाला समोरोप व नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मनाई करण्यात आल्यानंतरदेखील मध्यरात्री शेकडो नागरिकांवर पोलिसांनी कारवाई केल्याचे चित्र दिसून येत आहे.

- Advertisement -

व्हिडीओ : रवींद्र केडिया

शहरात येणार्‍या 36 मार्गांवर नाकाबंदी करण्यात आली होती. तर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त ठेऊन नागरिकांची तपासणी केली. यावेळी मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली.

रात्री संचारबंदीचे आदेश देण्यात आले होते. तसेच कोवीड 144 चे आदेश लागू आहेत. त्यानुसार रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत रात्री संचारबंदी असणार आहे. नाशिक शहरात 13 पोलीस ठाण्यांअंतर्गत 30 ठिकाणी नाकाबंदी करून तपासणी करण्यात आली.

सार्वजनिक ठिकाणे, खुली मैदाने, सोसायट्यांच्या गच्च्या या ठिकाणी गर्दी तसेच मद्यपान केल्यास कडक कारवाई करण्यात आली.

शहरातील सर्व हॉटेल्स व सर्व आस्थापना 11 वाजेच्या ठोक्याबरोबर बंद करण्यात आले होते.

शहरातील 13 पोलीस ठाण्यांअंतर्गत त्या त्या भागात कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले. तसेच गस्ती पथकांची संख्या वाढवण्यात आल्याने शहरात रात्रभर गस्त सुरू होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या