Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याVideo : पोलीस आयुक्त नरमले; महसूल मंत्र्यांची मागितली माफी, लेटर बॉम्बवर पडदा...

Video : पोलीस आयुक्त नरमले; महसूल मंत्र्यांची मागितली माफी, लेटर बॉम्बवर पडदा पडण्याची शक्यता

नाशिक |प्रतिनिधी Nashik

महसूल विभागाबाबतच्या पत्राविषयी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Revenue Minister Balasaheb thorat) यांनी नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय (Police Commissioner Deepak Pandey) यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती. एवढ्या मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तीने कायद्याच्या राज्यात असे वक्तव्य करणे दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले होते….

- Advertisement -

दरम्यान, पोलीस आयुक्त दीपक पांडेय (Police Commissioner Deepak Pandey) यांनी या लेटरवरून मंत्री बाळासाहेब थोरात यांची बिनशर्त माफी मागितली आहे.

एका व्हिडीओ द्वारे पोलीस आयुक पांडेय म्हणतात की, बाळासाहेब थोरात साहेब अत्यंत सुजाण आणि चांगले मंत्री आहेत. त्यांना दुखवायचा माझा हेतू नव्हता. आमच्याकडून काही चूक झाली असेल किंवा यातील भाषा चुकली असेल तर मी बिनशर्त माफी मागतो.

जनकल्याण, लोककल्याण हा एकच उद्देश यामागे होता. असे पोलीस आयुक्त पांडेय म्हणाले. माझ्या अनुभवातून हे पत्र लिहिलेले असल्याचे पोलीस आयुक्त पांडेय यांनी याप्रसंगी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या