Saturday, May 11, 2024
Homeमुख्य बातम्याVideo : पेट्रोल दरवाढ : एक लिटरवर तुम्ही किती कर भरता?

Video : पेट्रोल दरवाढ : एक लिटरवर तुम्ही किती कर भरता?

नाशिक | प्रतिनिधी

आज पुन्हा पेट्रोल व डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ झाली. नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार व नगरमध्ये ९३.५० पैशांच्या जवळपास पेट्रोल पोहचले आहे. परंतु पेट्रोलची खरी किंमत काय? तुम्ही त्यावर किती कर भरतात? पाहूया गणित…

- Advertisement -

भारतात अकबरी कर ३२.९८ पैसे प्रतिलिटर आहे.

डिलरचे कमिशन ३.६७ पैसे प्रतिलिटर आहे.

व्हॅट राज्यानुसार बदलतो. परंतु तो ३० टक्के आहे. (महाराष्ट्रात २६ टक्के)

म्हणजेच १०० रुपयांच्या पेट्रोलमध्ये तब्बल ६७ टक्के कर (राज्यानुसार बदलतो) तुम्ही भरत आहात.

आंतराष्ट्रीय बाजारात का वाढत आहे किंमत?

तेल उत्पादक देशांची संघटना अर्थात OPECने संयुक्तपणे निर्णय घेत खनिज तेलाचे उत्पादन कमी केले आहे. शिवाय सौदी अरेबियाला पुढच्या वर्षी सौदी अरामको या सरकारी तेल कंपनीचे शेअर बाजारात आणायचे आहेत. अशा वेळी तेलाच्या किंमती चढ्या असतील तर कंपनीच्या शेअरना किंमत मिळेल. या न्यायाने त्यांनीही तेलाच्या किमती वरच ठेवण्याची खबरदारी घेतली आहे

क्रूड ऑईल किती टक्के आयात होतो?

एकतर देशाच्या एकूण गरजेपैकी 80% तेल आपण आयात करतो.म्हणजेच डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर झाला तर आपल्याला पडणारा आर्थिक भार वाढतो.

सरकार कर कमी का करत नाही?

कर थोडा तरी कमी करून सरकार जनतेला दिलासा देऊ शकतो का, हा प्रश्न आहे. परंतु सध्या सरकारचे इतर उत्पन्न घटले आहे. यामुळे पेट्रोल-डिझेल हाच सरकारचा उत्पन्नाचा भाग आहे. पण सरकार सामान्य जनतेला मारणार तरी किती?

- Advertisment -

ताज्या बातम्या