Friday, April 26, 2024
Homeनाशिकबिनविरोध ग्रामपंचायत निवडीची सभा उधळली; सिन्नर तालुक्यातील घटना

बिनविरोध ग्रामपंचायत निवडीची सभा उधळली; सिन्नर तालुक्यातील घटना

पंचाळे | वार्ताहर

पंचाळे ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी विहित मुदतीत 51 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत…

- Advertisement -

चार प्रभाग असलेल्या या ग्रामपंचायतीत अकरा सदस्य संख्या आहे. अत्यंत चुरशीची ठरणारी ही निवडणूक काही व्यक्तींना बिनविरोध करण्याची डोहाळे लागले.

याबाबत आज सकाळी दहा वाजता ग्रामस्थांच्या बैठकीचे गावातील विठ्ठल मंदिर जवळील सभामंडपात बैठक आयोजित करण्यात आली होती.

परंतु अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना तसेच मतदारांना विश्वासात न घेता आयोजित केलेली ही सभा शे-दोनशे युवकांनी उधळून लावली.

सभेचे आयोजन करणाऱ्या कडून लाऊड स्पीकरची व्यवस्थाही करण्यात आली होती. तसेच व्हाट्सअप ग्रुप वर सूचना देण्यात आली होती.

परंतु या मिटिंग मध्ये मंदिरासाठी निधी संकलन करणे, ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडणे याबाबत चर्चा होऊन निर्णय होणार होता.

परंतु ही सभा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर छाननीनंतर होत असल्याने अनेक इच्छुक निवडणुकी पासून वंचित राहिले आहे. तसेच अनेक इच्छुकांनी आपल्या माणसांसाठी माघार घेतल्याने त्यांचा हा विश्वासघात असल्याचा आरोप करण्यात आला.

तसेच मंदिरासाठी ग्रामस्थ सक्षम असूनही जमिनीच्या गुंठा प्रमाणे वर्गणी ग्रामस्थ देऊ शकतात. त्यासाठी ग्रामपंचायतीची निवडणुकीचे कारण पुढे करणे संयुक्तिक नसल्याचे युवकांचे एकमत झाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या