अबब...नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत 3 लाख करोना टेस्ट

करोना
करोना

नाशिक । प्रतिनिधी Nashik Corona Test

जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव कमी होत चालला आहे. आतापर्यंत तिल्ह्यात 3 लाख 4 हजार 103 संशयितांच्या करोना चाचण्या करण्यात आल्या असून यातील 2 लाख 16 हजार 212 जणांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत...

तर 86 हजार 609 जणांच्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यापैकी 77 हजार 4 69 रूग्णांनी करोनावर मात केली आहे. यामुळे सध्या जिल्हभरात केवळ 7 हजार 593 पॉझिटिव्ह रूग्ण सिल्लक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात जिल्हा रूग्णालय, डॉ. वसंतराव पवार आरोग्य रूग्णालय या ठिकाणी असलेल्या करोना तपासणी प्रयोगशाळा तसेच शहरात कार्यरत खासगी प्रयोगशाळा व रॅपिड तपासणी या सर्वांच्या माध्यमातून जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात करोना रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे. हा आकडा 3 लाख 4 हजार 103 पर्यंत पोहचला आहे.

मागील आठवड्यापासून जिल्हयात पॉझिटिव्ह रूग्णांमध्ये मोठी घट झाली आहे. दाखल होणारे नवीन संशयित रूग्ण, तसेच करोना चाचण्यानंतर पॉझिटिव्ह येणारांचे प्रमाण घटले आहे. तसेच मृत्यूचेही प्रमाण घटत चालले असल्याने जिल्ह्यास दिलासा मिळणार आहे.

लॉकडाऊन शिथिलतेनंतर शहर तसेच ग्रामिण भागातही नागरीकांचे पुर्वीप्रमाणे व्यवहार सुरू झालेले आहेत. जिल्हा प्रशासन तसेच जिल्हा आरोग्य यंत्रणांनी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली असल्याने सर्वत्र मास्क वापरण्याचे प्रमाण चांगले आहे. सामुहिक रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाल्यानेही हे प्रमाण घटनल्याची चर्चा आहे. तसेच नागरीक काळजी घेत असल्याने हे प्रमाण घटत असल्याचे आरोग्य प्रशासनाने सांगीतले.

ग्रामिण भागात एकूण 3 हजार 605 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 3 हजार 579 मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात 286 तर जिल्ह्याबाहेरील 123 असे एकूण 7 हजार 593 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 86 हजार 609 रुग्ण आढळून आले आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत 1 हजार 548 रुग्णांचा मृत्यु झाला आहे. यामध्ये नाशिक ग्रामीण भागात 530, नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 819 , मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात 162 व जिल्हा बाहेरील 36 अशा रूग्णांचा सामावेश आहे.

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण

नाशिक तालुका - 634, चांदवड - 106, सिन्नर - 936, दिंडोरी - 230, निफाड - 710, देवळा - 46, नांदगांव - 166, येवला - 95, त्र्यंबकेश्वर - 88, सुरगाणा - 09, पेठ - 32, कळवण - 79, बागलाण - 178, इगतपुरी - 100, मालेगांव ग्रामीण - 195 असे ग्रामिण भागात एकूण 3 हजार 605 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. नाशिक शहर - 3 हजार 579, मालेगांव शहर- 286, जिल्ह्याबाहेरील - 123 असे एकूण 7 हजार 593 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.रुग्ण

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी अशी

एकुण बरे होणारे- 89.45

नाशिक ग्रामीण - 82.91 टक्के,

नाशिक शहरात - 92.39 टक्के,

मालेगाव मध्ये - 88.77 टक्के तर

जिल्हा बाह्य - 74.56 टक्के आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com