नाशिक जिल्ह्यातील आणखी एका आमदाराला करोनाची लागण

नाशिक जिल्ह्यातील आणखी एका आमदाराला करोनाची लागण

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक जिल्ह्यातीलआणखी एका आमदाराला करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. या आमदाराने एक पत्र लिहून याबाबतची माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांत जे कुणी संपर्कात आले असतील त्यांनी करोनाची चाचणी करून घेण्याचे आवाहनदेखील करण्यात आले आहे. जिल्ह्यातील...

सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माणिकराव कोकाटे यांचा करोना अहवाल मंगळवारी (दि. २५) पॉझिटिव्ह आला असून तालुक्यातील सोमठाणे या त्यांच्या मुळगावी ते क्वारंटाईन आहेत. याच ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

आमदार कोकाटे हे गेल्या आठवड्यात तालुक्यातील विविध विकास कामाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबतच्या एका बैठकीसाठी गेले होते. तेथुन परतल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले.

तेव्हापासून त्यांनी सार्वजनिक कार्यक्रम टाळले. रविवारी त्यांच्या उपस्थितीत सिन्नर शहर व ठाणगाव येथे विविध विकास कामांचा शुभारंभ होणार होता. मात्र, या याठिकाणी ते आलेले नव्हते. त्यांची कन्या सीमंतिनी यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर कोकाटे यांचा स्वब अहवाल काल प्राप्त झाला असून तो बाधित आलेला आहे.

याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ मोहन बच्छाव यांनी दिली. यावेळी आमदार कोकाटे यांना घरीच होम क्वारंटाईन राहण्याचा सल्ला देण्यात आल्याचे समजते,.

कोकाटे यांच्या कार्यकर्त्यांकडून सध्या पंचक्रोशीत सोशल मीडियात खालील संदेश पसरविला जात आहे.

माझ्या मतदारसंघातील प्रिय बंधू आणि भगिनींना माझा सप्रेम नमस्कार,

आज तुमच्या सोबत ह्या सामाजिक माध्यमातून संवाद साधत आहे. त्या मागील कारण ही तुमची गैरसोय होऊ नये तसेच तुमच्या आरोग्याची काळजी हेच आहे.

मागील आठवड्यात मतदारसंघातील विकास कामांच्या संदर्भात मंत्रालयीन कामकाजासाठी मुंबईला जावे लागले. सध्याच्या करोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी योग्य ती काळजी देखील त्यावेळी घेतली होती. मात्र, न कळत काही करोना पोझिटीव्ह लोकांच्या संपर्क या काळात झाला . सिन्नरला आल्यानंतर तब्बेतीत बिघाड जाणवल्याने मी स्वतःला होम कोरन्टाइन करून घेतले.

चाचणी केल्यानंतर मी कोरोना पोझिटीव्ह आलेलो आहे. मी स्वतःला होम कोरेन्टाइन करून घेऊन ट्रीटमेंट घेत आहे. त्यामुळे कृपया आपल्या सर्वांना विनंती आहे की, तुम्ही कोणीही माझ्या संपर्कात येऊ नये, भेटायला येऊ नये, अत्यंत महत्वाचे काम असल्यास माझे स्वीय सहाय्यक यांना संपर्क करावा अथवा सिन्नरच्या संपर्क कार्यालयाशी संपर्क करावा. तुम्ही प्रत्येकाने देखील स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, ही विनंती.

कळावे,

आपला स्नेहांकित,

आमदार माणिकराव कोकाटे

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com