साल्हेर किल्ल्यावरून पडून मालेगावच्या तरुणाचा मृत्यू; एक जखमी

साल्हेर किल्ल्यावरून पडून मालेगावच्या तरुणाचा मृत्यू; एक जखमी

सटाणा | प्रतिनिधी Satana

बागलाण तालुक्यातील (Baglan Taluka) शिवकालीन साल्हेर किल्ल्यावर (Salher Fort) आज (दि १५) दुपारी बारा वाजेच्या सुमारास दोन हौशी पर्यटक पाय घसरून दरीत कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्या तरुणाचा पाय मोडल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर उपचार सुरू आहेत....

अधिक माहिती अशी की, जिल्ह्यात सर्वदूर पावसाचे आगमन झाल्यामुळे निसर्गपर्यटन वाढले आहे. बागलाण तालुक्यातील साल्हेर किल्ल्यावर (Salher Fort) मालेगाव (Malegaon) येथील १२ तरुणांचा एक समूह पर्यटनासाठी आलेला होता.

या ग्रुपने अवघड समजल्या जाणाऱ्या साल्हेर वाडीकडून (Salher wadi) उघड्या दरवाजाकडून किल्ल्याच्या चढाईला सुरुवात केली होती. येथील अतिशय अवघड अशा ६५ पायऱ्या आहेत. याच ठिकाणाहून भावेश शेखर अहिरे (वय २१) या तरुणाचा पाय घसरला. हा तरुण दरीत कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर मनिष सुनील मुठेकर (वय २१) हादेखील याच ठिकाणाहून खाली कोसळला असून तो जखमी आहे.

या समूहातील काही तरुणांनी घटनेची माहिती मालेगाव (Malegaon) येथे दिली. यानंतर घटनास्थळी मुल्हेर (Mulher) आणि जायखेडा पोलिसांनी (Jaykheda Police) धाव घेतली. मालेगाव येथील अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी हेदेखील या मुलांना वाचविण्यासाठी मालेगावहून साल्हेर किल्ल्याजवळ आले. त्यांनीही चढाईकरून जखमीला आपल्या पाठीवर बसवून थेट खाली उतरले. दुसरीकडे मगरबारयाचा गणपती असलेल्या परिसरातून तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

घटनेची माहिती साल्हेरचे सरपंच मधुकर भोये यांनी जायखेडा पोलिस ठाण्यात माहिती दिली. यानंतर माहिती मालेगाव येथे देण्यात आली. जायखेड्याचे सहायक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी व पोलीस नाईक रवी भामरे पुढील तपास करत आहेत. याप्रकरणी जायखेडा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com